CR Mumbai Local Time Table Update: मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये 5 ऑक्टोबर पासून होणार बदल

या मुंबई लोकल सीएसएमटी (CSMT) ते दादर (Dadar) दरम्यान धावणार्‍या जलद ट्रेन आहे.

Mumbai Local Train | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई लोकल (Mumbai Local) ही शहराची लाईफ लाईन आहे. त्याच्या वेळापत्रकावर अनेकांचं दिवसभरातील कामं अवलंबून असतात. आता या वेळापत्रकामध्ये झालेले बदलही महत्त्वाचे आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून मुंबई लोकलच्या वेळापत्रकामध्ये बदल होणार असल्याचं म्हटलं आहे. 5 ऑक्टोबर पासून हे बदल होणार आहेत

सीएसएमटी स्थानकामधील 10 अप आणि 10 डाऊन मुंबई लोकल मध्ये हे बदल होणार आहेत. 5 ऑक्टोबर पासून या लोकलची सुरूवात आणि शेवट दादर स्थानकामध्ये होणार आहे. Mumbai Local Train Death: जीवघेणा लोकल प्रवास! 20 वर्षांत 51,000 प्रवाशांचा मृत्यू, रेल्वेची हायकोर्टात माहिती .

गर्दीमुळे, विशेषतः गर्दीच्या वेळी, काही गाड्यांना सीएसएमटीच्या आऊटर सिग्नलवर थांबावे लागते. 254 जलद गाड्या सीएसएमटी येथून निघतात आणि सुटतात, प्लॅटफॉर्मच्या कमतरतेमुळे अनेकदा त्यांना विलंब होतो. सीएसएमटी ते दादर येथे 10 जलद गाड्यांमध्ये बदल होणार आहेत. गाड्या उशिराने धावण्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी, कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि सीएसएमटी स्थानकात प्रतीक्षा वेळा कमी करण्यासाठी हे बदल होत आहेत. यामुळे सीएसएमटी स्थानकामध्ये गर्दी कमी होईल तर दादर स्थानकामध्येही प्रवाशांना त्रास कमी होणार आहे.