मध्य रेल्वेमार्गावर लोकलमधून खाली पडून पाच विद्यार्थी गंभीर जखमी, एकाचा मृत्यू
त्यावेळी ट्रेनमधील गर्दी एवढी होती की, सहा जण या ट्रेनच्या डब्यातून खाली पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मुंबई ही घडाळ्याचा काट्यावर चालते. तशी मुंबईतील लोकलसाठी ही गर्दी घड्याच्या काट्याप्रमाणे वाढत जाते. त्यामुळे मुंबईच्या लोकने प्रवास जपून करणे अत्यावश्यक झाले. परंतु निष्काळजीपणाने लोकलचा प्रवास करणे महागात पडू शकते. अशीच एक घटना गुरुवारी सायन रेल्वेस्थानकाजवळ घडली आहे.
कॉलेजला जाणारे सहा विद्यार्था लोकल ट्रेनमधून सकाळी प्रवास करत होते. त्यावेळी ट्रेनमधील गर्दी एवढी होती की, सहा जण या ट्रेनच्या डब्यातून खाली पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. करी रोड येथील एसवीएस ज्युनिअर महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. हे सर्व विद्यार्थी परिक्षेला जाण्यासाठी लोकलने प्रवास करत होते. परंतु सायन स्थानकातील खांब्याला आदळून त्यांच्यातील एक मित्र खाली कोसळा. तर या मित्राला वाचवण्यासाठी इतर मित्रांनी ही मदत केली परंतु ते सुद्धा जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर रेल्वेतील काही प्रवाशांनी स्टेशन पोलिसांना या घटनेबाबत कळवले. पोलिसांनी तातडीने धाव घेत जखमी झालेल्या मुलाला संजय गांधी रुग्णालयात उपाचारासाठी दाखल केले. परंतु उपाचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तर जखमी झालेल्या इतर मित्रांची प्रकृती आता ठीक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.