Mumbai Local: मुंंबई लोकल ट्रेन लवकर सुरु करा, संतप्त प्रवाशांचं विरार मध्ये आंदोलन (Watch Video)
आज विरार रेल्वे स्थानकात (Virar Railway Station) अशाच शेकडो संतप्त प्रवाशांंनी आंदोलन केल्याने समजत आहे. याचा एक व्हिडीओ सुद्धा पाहायला मिळत आहे.
मुंंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकल ट्रेन (Mumbai Local) लॉकडाउन (Lockdown) लागु झाल्यापासुन सामान्य नागरिकांंसाठी बंंद करण्यात आल्या होत्या,आता वास्तविक लोकल सुरु जरी झाल्या असली तरी केवळ सरकारी व वैद्यकीय कर्मचारी यांंनाच प्रवेश दिला जात आहे. मात्र खाजगी कंंपनीतील कर्मचार्यांंना रेल्वेने प्रवास करायचा झाल्यास त्यासाठी अनेक नियम आहेत काही जण इतकी डोकेदुखी करण्यापेक्षा एसटी बसने प्रवास करण्याचा मार्ग निवडतात मात्र त्यात होणारा त्रास आणि वाया जाणारा वेळ पाहता हा पर्याय सुद्धा नसता खटाटोप ठरत आहे. या सर्व परिस्थितीमध्ये मुंंबई लोकलची सेवा लवकरात लवकर सुरु करावी यासाठी आता प्रवासी आक्रमक झाले आहेत. आज विरार रेल्वे स्थानकात (Virar Railway Station) अशाच शेकडो संतप्त प्रवाशांंनी आंदोलन केल्याने समजत आहे. याचा एक व्हिडीओ सुद्धा पाहायला मिळत आहे.
विरार रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी प्रवाशांनी आंदोलन केले. सकाळी 11 वाजता प्रवासी घोषणा देत रेल्वे रुळावर आणि लगतच्या परिसरात उतरले होते. काही वेळाने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र तोवर सोशल डिस्टसिंग सह सर्वच नियमांंचा फज्जा उडाला होता. यापुर्वी 22 जुलै रोजी देखील नालासोपारा रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी आंदोलन केले होते.
पहा ट्विट
दरम्यान, या व्हिडिओ मध्ये आपण पाहु शकता की, हे प्रवासी संतप्त पणे आपल्या मागण्या मांंडत आहेत. बस उशीराने पोहचत असल्याने ऑफिस ते घर असा प्रवासातच जास्त वेळ जातो त्यात रस्त्यातील खड्ड्यांंमुळे शरिराला त्रास तो वेगळाच असे अनेकांंनी म्हंंटले आहे. तर बसेसची कमी संंख्या आहे त्यामुळे गर्दी जास्त होते परिणामी सोशल डिस्टंसिंग पाळणे कठीण होते त्यापेक्षा रेल्वे सुरु करण्याला काय हरकत आहे असेही मत ऐकु येत आहे.