Mumbai Local Update: 13 मार्च दिवशी मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गावर 'असा' असेल ब्लॉक!
यंदा रविवार 13 मार्च दिवशी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे लाईन मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे.
मध्य रेल्वेकडून (Central Railway) तांत्रिक गोष्टींच्या कामासाठी रविवार 13 मार्च दिवशी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. हा ब्लॉक ठाणे (Thane) ते कल्याण (Kalyan) स्टेशन दरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर असणार आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 असा 8 तासांचा हा मेगाब्लॉक (Mega Block) असणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या सेवांवर त्याचा परिणाम होणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावर ठाणे-कल्याण ब्लॉकच्या काळात फास्ट लोकल स्लो ट्रॅक वर चालवल्या जाणार आहेत. ब्लॉक काळात ठाणे-कल्याण दरम्यान 15 मिनिटं ट्रेन उशिराने अपेक्षित आहे.
मध्य रेल्वेच्या मेन लाईन सोबत हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यानही अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक आहे. या ब्लॉकच्या काळात सीएसएमटी ते वाशी आणि बेलापूर ते पनवेल स्थानकादरम्यान सकाळी 11 ते संध्याकाळी 4 या काळात लोकल बंद ठेवली जाणार आहे.
मध्य रेल्वे मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असणार आहे. या ब्लॉक मध्येही विविध दुरूस्तीची कामं केली जाणार आहेत. पश्चिम मार्गावर स्लो ट्रॅकवरील लोकल काही स्थानकांत फास्ट ट्रॅकवरून चालवण्यात येणार आहेत.
दरम्यान मुंबई मध्ये कोरोनाची स्थिती नियंत्रणामध्ये आल्याने आता निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई लोकलमध्ये आता पूर्वीप्रमाणे गर्दी आढळायला सुरूवात झाली आहे. अद्याप मुंबई लोकल प्रवासासाठी कोविड 19 लसीच्या दोन्ही डोसची अट शिथिल करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबई लोकल प्रवासासाठी अजूनही तुम्हांला लस बंधनकारकच असणार आहे. त्यामुळे यंदा विकेंडला रेल्वे प्रवास करत बाहेर पडणार असाल तर मेगाब्लॉकचं वेळापत्रक पहाच पण त्या सोबतच नियमावली कडेही लक्ष द्या.