Mumbai Local Mega Block: मुंबई लोकलच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

मुंबई लोकलच्या पश्चिम रेल्वे मार्गावर मात्र आज कोणताही मेगाब्लॉक नसणार आहे.

Mumbai Local | (File Image)

मुंबईकरांची लाईफलाईन अर्थात मुंबई लोकल (Mumbai Local) आज मेगा ब्लॉक (Mega Block) मुळे मध्य आणि हार्बर मार्गावर काही काळ प्रवाशांच्या सेवेत नसणार आहे. देखभाल आणि दुरूस्तीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेतला जाणार असून त्यामुळे मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते कुर्ला (CSMT-Kurla) आणि पनवेल ते वाशी (Panvel-Vashi) दरम्यान विशेष लोकल धावणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण दरम्यान देखील 5,6 मार्गिकेच्या कामासाठी हार्बर वर कुर्ला ते वाशी (Kurla-Vashi) अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

मुंबई लोकलच्या या ब्लॉकच्या कालावधीमध्ये सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालवली जाणार आहे. ब्लॉकच्या कालावधीमध्ये अप आणि डाऊन जलद मार्गावर लोकल सेवा विरार ते वसई दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर चालवली जाईल. प्रगती एक्स्प्रेससह अन्य मेल-एक्स्प्रेस देखील आज 10-15 मिनिटं विलंबाने धावतील अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हार्बर मार्गावर देखील सीएसएमटी कडून पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन लोकल बंद राहणार आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी या भागात विशेष लोकल चालवल्या जातील.

पश्चिम रेल्वेमार्गावर आज दिवसा मेगाब्लॉक नाही त्यामुळे या मार्गावर प्रवासी सुरळीत प्रवास करू शकतात.