Mumbai Local Mega Block Update: मुंबई लोकल च्या पश्चिम रेल्वे मार्गावर 14 तासांचा विशेष ब्लॉक; पहा मध्य, हार्बर रेल्वेचं वेळापत्रक

मुंबईची लाईफ लाईन असणार्‍या लोकल च्या डागडुजीच्या कामासाठी पावसाळ्यापूर्वी रेल्वेने काही महत्त्वाची कामं हाती घेतली आहेत.

Mumbai Local | (Photo Credit - Twitter)

पश्चिम रेल्वेने जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यानच्या पुलाच्या कामासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वेने 14 तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. हा ब्लॉक शनिवार मध्यरात्री बारा ते रविवार दुपारी 2 वाजेपर्यंत असा एकूण 14 तासांचा असणार आहे. या विकेंडला रविवारी हार्बर अप आणि डाऊन मार्गावर देखील ब्लॉक असणार आहे. या दरम्यान वांद्रे ते गोरेगाव अप-डाऊन लोकल बंद राहणार आहेत. शनिवारी (10 जून) च्या रात्री शेवटची गोरेगाव लोकल सीएसएमटी स्थानकातून 10.54 ला सोडली जाईल. तर गोरेगाव- सीएसएमटी शेवटची लोकल 11.06 ची असणार आहे. ब्लॉक संपल्यानंतर गोरेगाव लोकल दुपारी 2.33 आणि सीएसएमटी लोकल 2.18 वाजता सुटेल.

मध्य रेल्वे मार्गावर देखील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार आहे. यामुळे मुंबई लोकलची वाहतूक सेवा विस्कळीत असणार आहे. सीएसएमटी ते विद्याविहार चा ब्लॉक 11 जूनला सकाळी 11 ते 4 दरम्यान असणार आहे. यावेळी स्लो ट्रॅक वरील काही लोकल फास्ट ट्रॅक वर चालवल्या जाणार आहेत. नक्की वाचा: Dog Takes Mumbai Local: अजब कुत्रा, प्रवासासाठी वापरतो मुंबई लोकल, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी दिली प्रतिक्रिया (Watch Video) .

मुंबई लोकलचं मेगा ब्लॉकचं वेळापत्रक

हार्बर मार्गावरही सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर आणि ठाणे ते पनवेल दरम्यान अप आणि डाऊन लोकल रद्द राहणार आहेत.