Mumbai Local Megablock Today: मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक, कसा कराल प्रवास?
त्यासाठी घराबाहेर पडण्याआधी मेगाब्लॉक बद्दल माहिती करुन घ्या.
लॉकडाऊन (Lockdown) आणि सोशल डिस्टंसिंग (Social Distancing) पाळण्याच्या उद्देशाने मुंबईतील लोकलसेवा ही केवळ अत्यावश्यक सेवेत येणा-या कर्मचा-यांसाठी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वेमध्ये जरी रोजची गर्दी पाहायला मिळत नसली तरी रेल्वेची रविवारीची दुरुस्तीची कामे मात्र आजही सुरु आहेत. रेल्वेच्या रुळांच्या दुरुस्तीसाठी आणि तांत्रिक कामासाठी आज मध्य आणि हार्बर रेल्वेचा (Harbour Railway) मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. मध्य रेल्वे मार्गावर (Central Railway) सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. हा मेगाब्लॉक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते विद्याविहार (Vidyavihar) अप आणि डाउन धीम्या मार्गावर असणार आहे.
आज रविवार जरी असला तरी अनेक अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना लोकलने प्रवास करावा लागेल. त्यासाठी घराबाहेर पडण्याआधी मेगाब्लॉक बद्दल माहिती करुन घ्या. Mumbai Local Updates: मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावरील ट्रेन्समध्ये गर्दी टाळण्यासाठी आजपासून 68 अधिक फेर्या वाढवल्या; सोशल डिस्टंसिंग पाळण्याचं आवाहन
मध्य रेल्वे
आज सकाळी 10 वाजता ते दुपारी 3 वाजेर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यादरम्यान धिम्या मार्गावरील सर्व डाउन विशेष उपनगरी सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील व निर्धारित थांब्यांवर थांबतील. तर धिम्या मार्गावरील सर्व अप उपनगरी विशेष सेवा विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.
हार्बर रेल्वे
हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी डाउन हार्बर मार्गावर सकाळी 10 वाजून 40 ते दुपारी 3 वाजून 40 मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तर अप हार्बर मार्गावर सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून वाशी/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील विशेष सेवा सकाळी 11.15 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत बंद राहील. तर पनवेल/वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी अप हार्बर मार्गावरील विशेष सेवा सकाळी 9.05 ते दुपारी 3.45 या वेळेत बंद राहतील.
या मेगाब्लॉकच्या वेळापत्रकाचा अंदाज घेऊन त्यानुसार प्रवास करावा असे अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.