Mumbai Mega Block: मुंबईत उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

रेल्वे प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Mumbai Local | (File Image)

मुंबई लोकल (Mumbai Local) ट्रेनने रविवारी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. उद्या  रविवारी लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. उपनगरी रेल्वे (Suberban Railway) मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही लोकलफेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत, तर काही फेऱ्या 20 मिनिटे विलंबाने धावणार आहेत. त्यामुळे रविवारी तुम्ही सुद्धा घराबाहेर पडणार असाल, तर रेल्वेचं वेळापत्रक जाणून घेणे गरजेचे आहे.  (हेही वाचा -Mumbai: काम करणाऱ्या महिलांना दिलासा; शहरात लवकरच सुरु होणार सरकारी पाळणाघर आणि डे केअर सेंटर्स; मंत्री अदिती तटकरे यांची माहिती)

रेल्वे प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी जारी करण्यात आलेला मेगाब्लॉक यामुळे मुंबईकरांना मोठा मनस्ताप होण्याची शक्यता आहे. मानखुर्द-नेरुळ अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11:15 ते दुपारी 4:15 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. तर मध्य रेल्वेच्या माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर रविवारी सकाळी सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 पर्यंत मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुझ ते गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते मानखुर्ददरम्यान स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार आहे. तसेच हार्बर मार्गावरील प्रवासी रविवारी सकाळी १० ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर आणि मुख्य मार्गावरून प्रवास करू शकतात.