मुंबई लोकल मेगाब्लॉक: रविवारी रेल्वेच्या मध्य मार्गावर मेगाब्लॉक तर पश्चिम मार्गावर जम्बो ब्लॉक
मुंबईची लाईफलाईन असलेली रेल्वे लोकलवर दर रविवारी दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येतो.
मुंबईची लाईफलाईन असलेली रेल्वे लोकलवर (Mumbai Railway) दर रविवारी दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येतो. रविवार (20/1/2019) या दिवशीही मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या परळ टर्मिनसचे काम सुरु असून पश्चिम रेल्वे मार्गावर सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरची देखभाल करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर मात्र मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. म्हणूनच रविवारी बाहेर पडणार असलात तर या बदललेल्या वेळा लक्षात घ्या. अन्यथा खोळंबा होण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वे
# भायखळा ते माटुंगा डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
# ब्लॉक काळात सीएसएमटीवरून सकाळी 8:49 ते सायंकाळी 5:48 पर्यंत भायखळा येथून माटुंग्याकडे जाणाऱ्या धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा या स्थानकांवर थांबतील. माटुंगा स्थानकानंतर या लोकल जलद मार्गावरून धिम्या मार्गावरुन धावतील. मात्र या लोकल करीरोड, चिंचपोकळी या स्थानकांवर थांबणार नाहीत. पण परळ स्थानकात फलाट क्रमांक 3 वर धिम्या आणि जलद लोकल थांबविण्यात येतील.
पश्चिम रेल्वे
# पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत बोरिवली ते भाईंदर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.
# ब्लॉकदरम्यान चर्चगेटकडे जाणाऱ्या सर्व जलद लोकल विरार, वसई रोड ते बोरीवलीपर्यंत धिम्या मार्गावरून वळविण्यात येतील.
# विरारकडे जाणाऱ्या जलद लोकल बोरीवली ते वसई रोड, विरारपर्यंत धिम्या मार्गावर चालवण्यात येतील.
मेल, एक्स्प्रेस रद्द
गाडी क्रमांक 22102 आणि 22101 मनमाड-मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक 12110 आणि 12109 मनमाड-मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक 11010 आणि 11009 पुणे-मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, गाडी क्रमांक 12124 आणि 12123 पुणे-मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.