Mumbai Local Mega Block on 3 January Update: मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक; पश्चिम रेल्वे मार्गावर जंम्बो ब्लॉक नसल्याने दिलासा
3 जानेवारीच्या रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर वेळापत्रकामध्ये मेगा ब्लॉक मुळे काहीसा बदल असला तरीही पश्चिम रेल्वेवर जंबो ब्लॉक असणार नाही.
मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलचा (Mumbai :Local) दर रविवारी देखभाल आणि दुरूस्तीसाठी मेगा ब्लॉक घेतला जातो. त्यानुसार, या रविवारी 3 जानेवारीला देखील मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणार्यांसाठी दिलासादायक बाब आहे. या रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही ब्लॉक नसेल असे सांगण्यात आले आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलूंड तर हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमती ते चुनाभट्टी/ वांद्रे या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान रविवार, 3 जानेवारीला सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत असला तरीही ब्लॉकमुळे पर्यायी मार्गाने लोकल फेर्या सुरू राहणार आहेत. तर पश्चिम रेल्वे मार्गावर वाहतूक सुरळीत ठेवली जाणार आहे. महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या महिला जवान लता बनसोडे यांनी रूळावर पडलेल्या प्रवाशाला वाचवण्यासाठी लोकल समोर उडी मारत बजावलं कर्तव्य; पहा ग्रॅन्ट रोड स्थानकातील हा प्रसंग.
मध्य रेल्वे मार्ग मेगा ब्लॉक अपडेट्स
मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलूंड स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असेल. हा अपा आणि डाऊन जलद मार्गावर असेल. सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 पर्यंत हा ब्लॉक असेल. ब्लॉकच्या काळात जलद मार्गावरील लोकल फेर्या धीम्या मार्गावरून चालवल्या जाणार आहेत. परिणामी काही लोकल फेर्या रद्द केल्या जातील. तर काही विलंबाने धावतील.
हार्बर रेल्वे मार्ग मेगा ब्लॉक अपडेट्स
हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/ वांद्रे या मार्गावर मेगाब्लॉक असेल. हा ब्लॉक सकाळी 11.05 ते 4.05 पर्यंत असेल. ब्लॉक दरम्यान सीएसएमटी ते बेलापूर/ पनवेल अप डाऊन लोकल फेर्या बंद राहतील. सीएसटीएम वरून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 या वेळेत पनवेल/ बेलाअपूर/ वाशी येथून सुटणार्या लोकल बंद राहतील.
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर वेळापत्रकामध्ये काहीसा बदल असला तरीही पश्चिम रेल्वेवर जंबो ब्लॉक असणार नाही.