Mumbai Local Mega Block 11 August: मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक!
उद्या, म्हणजेच 11 ऑगस्ट 2019 रोजी मध्य (Central Railway), पश्चिम (Western Railway) व हार्बर रेल्वे (Harbour Railway) मार्गावर जम्बोब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. परिणामी रविवारी मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्या सुमारे 15 ते 20 मिनिटे विलंबाने धावणार आहे.
मुंबईच्या रेल्वे मार्गांवर रविवार म्हणजे ब्लॉकवार म्हणून ओळखला जातो. यादिवशी विविध तांत्रिक व व्यवस्थापकीय कामासाठी मुंबई रेल्वेवर लोकल गाड्यांची वाहतूक कमी केली जाते. मागील रविवारी तुफान पावसामुळे अगोदरच रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याने लोकांना या अधिकृत ब्लॉकपासून किंचित दिलासा मिळाला होता. यावेळेस मात्र हा त्रास सहन करावा लागणार आहे. उद्या, म्हणजेच 11 ऑगस्ट 2019 रोजी मध्य (Central Railway), पश्चिम (Western Railway) व हार्बर रेल्वे (Harbour Railway) मार्गावर जम्बोब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. परिणामी रविवारी मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्या सुमारे 15 ते 20 मिनिटे विलंबाने धावणार आहे. पुणे, कोल्हापूर शहरातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर 16 ऑगस्ट पर्यंत लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे दरम्यान अप जलद मार्गावर सकाळी 10.54 ते दुपारी 3.52 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात ब्लॉक काळात अप जलद मार्गावरील वाहतूक अप धीम्या मार्गावरून वळवण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत लोकल फेऱ्या सुमारे 20 मिनिटे आणि मेल-एक्स्प्रेस सुमारे 30 मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
पश्चिम रेल्वे
उद्या सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकांमध्ये डाऊन धीम्या रेलमार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 दरम्यान ब्लॉकचे नियोजन करण्यात आले आहे. परिणामी अप-डाऊन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप-डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. ब्लॉकमुळे विलेपार्ले स्थानकात दोन वेळा लोकल थांबवण्यात येणार असून राम मंदिर स्थानकात फ्लॅटफॉर्म नसल्यामुळे लोकल थांबणार नाही.
हार्बर रेल्वे
सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकात अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.34 ते दुपारी 4.23 पर्यंत ब्लॉक असणार आहे. या दरम्यान सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. पनवेल-कुर्ला मार्गावर विशेष लोकल चालविण्यात येईल. सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत हार्बर मार्गावरील प्रवाशांना मध्य-पश्चिम मार्गावर प्रवास करण्याची सूर देण्यात आली आहे.
मागील काही दिवसात पावसामुळे मुंबईचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले होते. याचा पहिला परिणाम हा रेल्वे वाहतुकीवर झाला होता, ज्यामुळे मध्य, पश्चिम व हार्बर रेल्वे मार्गावर बऱ्याचदा लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात येत होत्या. मागील रविवारी मात्र तुफान पाऊस असतानाही रेल्वेची वाहतूक सुरळीत चालू होती, तसेच मेगाब्लॉकही रद्द केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला होता.