Mumbai Local Jumbo Block Today: मुंबई लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्री पाच तासांचा जंबो ब्लॉक; नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे अवाहन

परिणामी पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावरुन धावणाऱ्या लोकल रेल्वेच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Western Railway Jumbo Mega Block | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई येथील गोरेगाव आणि कांदिवली (Goregaon To Kandivali) दरम्यान सुरू असलेल्या 6व्या मार्गावरील कामासाठी पाच तासांचा ब्लॉक (Mumbai Local Jumbo Block Today) घेण्यात येणार आहे. परिणामी पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावरुन धावणाऱ्या लोकल रेल्वेच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी उपनगरीय रेल्वे सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांनी व्यत्यय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हा ब्लॉक 28 ऑगस्ट रोजी रात्री 11:00 ते 29 ऑगस्ट, 2024 रोजी पहाटे 4:00 वाजेपर्यंत असेल. या कालावधीत मुंबईच्या अनेक लोकल गाड्या रद्द किंवा उशीर होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे हजारो दैनंदिन प्रवाशांवर परिणाम होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

एकूण 22 मुंबई लोकल गाड्या रद्द

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, चर्चगेट ते बोरिवली आणि अंधेरी ते विरार या प्रमुख मार्गांसह एकूण 22 मुंबई लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त, मालाड आणि बोरिवली सारख्या स्थानकांवर अनेक गाड्या कमी कालावधीसाठी थांबवल्या जातील किंवा बोरिवली आणि अंधेरी दरम्यान प्रतिबंधित मार्गावर चालतील. (हेही वाचा, Mumbai Western Railway Block: पश्चिम रेल्वेवर 35 दिवसांचा ब्लॉक, 960 लोकल फेऱ्यांवर परिणाम)

प्रवाशांनी या लोकल फेऱ्या रद्दीकरण आणि विलंबाची नोंद घेऊन त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. प्रभावित गाड्यांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे आहे.

रद्द केलेल्या गाड्यांची यादी:

शॉर्ट-टर्मिनेटेड/ओरिजिनेटेड ट्रेन्स:

जंंबो ब्लॉकचा कालावधी किती?

दरम्यान, पश्चिम रेल्वेने म्हटले आहे की, नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा आणि त्यांच्या प्रवासात व्यत्यय येऊ नये, यासाठी हे काम रात्रीच्या वेळेत पार पाडण्याचे नियोजन आहे. जेणेकरून आठवड्याच्या दिवसात कमीत कमी व्यत्यय निर्माण होईल. वांद्रे टर्मिनसवरून धावणाऱ्या गाड्या 28-29 सप्टेंबर आणि 5-6 ऑक्टोबर रोजी 40-45 मिनिटांनी नियमन केल्या जातील जेव्हा नॉन-इंटरलॉकिंग काम केले जाईल. वांद्रे टर्मिनस दरम्यानची 5वी लाईन चालू असताना, 6वी लाईन खार आणि गोरेगाव दरम्यान कार्यरत आहे, तर सध्याचे काम गोरेगाव ते कांदिवलीपर्यंत विस्तारण्याचे काम आहे, असे रेल्वेने सांगितले. हे काम पूर्ण झाल्यानंतर, 6वी लाईन बोरिवलीपर्यंत वाढवली जाईल. ती लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी एक समर्पित कॉरिडॉर प्रदान करेल. वाढीव क्षमतेमुळे गर्दी कमी करणे आणि वक्तशीरपणा सुधारणे यामुळे प्रवाशांना फायदा होईल," असे एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.