Mumbai Local Train Dance Viral Video: मुंबई लोकलमध्ये तरुणीचा अश्लील डान्स, रेल्वे पोलीस करणार कारवाई
महिलांच्या डब्यात डान्स करणाऱ्या या तरुणीचा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत ती तरुणी संया मारे सटा सट या भोजपुरी गाण्यावर अश्लील हावभाव करुन डान्स करताना दिसून येत आहे.
एका तरुणीने मुंबई लोकलच्या डब्यात अश्लील नृत्य करून रिल्स बनवून सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल केला. सध्या हा व्हिडिओ चांगलाच वायरल होत आहे. मात्र यामुळे आता त्या तरुणीच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. वायरल व्हिडिओमध्ये भोजपुरी गाण्यावर तरुणी अश्लील नृत्य करत असल्याचे दिसून येत आहे. या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यानंतर आता अश्लील नृत्य करण्याचं हे फॅड दिवसेंदिवस वाढू नये यासाठी रेल्वे पोलिसांनी या प्रकरणांची दखल घेत कारवाईचे आदेश दिले आहेत.
पाहा व्हिडिओ -
Now I know why railways stocks are skyrocketing pic.twitter.com/HBaExbats4
— desi mojito 🇮🇳 (@desimojito) February 23, 2024
महिलांच्या डब्यात डान्स करणाऱ्या या तरुणीचा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत ती तरुणी संया मारे सटा सट या भोजपुरी गाण्यावर अश्लील हावभाव करुन डान्स करताना दिसून येत आहे. महिलांच्या डब्यात डान्स करणाऱ्या या तरुणीचा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पण या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे.
दरम्यान व्हिडिओ सोशल माध्यमातून वायरल झाल्यानंतर नेटकऱ्याने हा व्हिडीओ एक्सवर पोस्ट करुन मुंबई पोलीस, पश्चिम रेल्वेला टॅग केलं आहे. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत त्या पोस्टला रिप्लाय दिला आणि संबंधित प्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Feb 24, 2024 10:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

