Mumbai Local Accident: लोकल मधील गर्दीत दादगिरी करत चौघांनी ढकललेला प्रवासी ट्रॅक वर पडला, हात गमवला; आरोपींचा तपास सुरू

हॉस्पिटल मधून सुट्टी मिळाल्यानंतर पोलिस पीडीत कुमारला सीसीटीव्ही फूटेज दाखवणार आहेत. ज्याद्वारा आरोपी ओळखले जाऊ शकतात.

Indian Railways | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

नवी मुंबई मध्ये उत्तर प्रदेश चा एक व्यक्ती लोकल ट्रेन मधून पडल्याने दिव्यांग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गर्दीमुळे तो खाली पडल्याची ही घटना 26 एप्रिलची आहे. पीडीत व्यक्तीचं नाव कुमार लालजी दिवाकर आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार त्याने उजवा हात गमावला आहे आणि पायाला फ्रॅक्चर झाले आहे. कुमार हा चार मुलांचा बाप आहे. नेरूळला लोकल मध्ये चढल्यानंतर 4जणांनी त्याच्यासोबत अरेरावी करत त्याला बाहेर फेकल्याचं समोर आले आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्ट्सनुसार, ही घटना 26 एप्रिलची आहे. नेरूळ ते उरण प्रवास करण्यासाठी कुमार ट्रेनमध्ये चढला. ट्रेन सुरू होताच तो गर्दी मध्ये स्वतःला जागा करत होता. यामुळे ट्रेनमधील अन्य 4 प्रवासी वैतागले. नंतर त्यांनी कुमार सोबत अरेरावी सुरू केली. त्याने माफी मागितली तरीही त्यांनी त्याच्यावर दादागिरी सुरूच ठेवली. एकाने त्याला डब्ब्यातून ढकलण्यापूर्वी चाकूचा धाक दाखवला. तो खाली पडताच ट्रेन त्याच्या हातावरून गेली. त्याच्या पायाला देखील दुखापत झाली.

रेल्वे कर्मचार्‍यांना हा प्रवासी ट्रॅक वर पडलेला दिसला तेव्हा त्यांनी तातडीने त्याला वाशीच्या NMMC Hospital मध्ये नेले आणि हा प्रकार प्रकाशझोकात आला. वाशी मधून त्याला सायन हॉस्पिटलला नेण्यापूर्वी जे जे हॉस्पिटल मध्येही आणण्यात आले.

डॉक्टरांनी कुमारची स्थिती स्थिर असल्याचं सांगितलं मात्र त्याला उजवा हात गमवावा लागला आहे. जीआरपी कडून जबाब नोंदवून तक्रार घेण्यात आली आहे. त्याला हॉस्पिटल मधून सुट्टी मिळाल्यानंतर पोलिस त्याला सीसीटीव्ही फूटेज दाखवणार आहेत. ज्याद्वारा आरोपी ओळखले जाऊ शकतात. दरम्यान पीडीत कुमारच्या नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार तो शहरात नोकरीच्या शोधासाठी आठवडाभरापूर्वीच आला होता. उल्वे मध्ये तो लॉन्ड्री साठी नोकरी शोधत होता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

लवकरच सुरु होऊ शकते पुणे-दिल्ली Vande Bharat Sleeper Train; मुरलीधर मोहोळ यांनी घेतली अश्विनी वैष्णव यांची भेट, पुणे-नाशिक सेमी-हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पावरही झाली चर्चा

दीनानाथ मंगेशकर रूग्णालय मुख्यमंत्री कार्यालयाला जुमानत नसतील तर इतरांच काय घेऊन बसलात? पुण्याच्या गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचे X पोस्ट शेअर करत आरोप

Mumbai Metro-3 Aqua Line Expansion: मुंबई मेट्रो 3 चा वरळी पर्यंतचा टप्पा लवकरच होणार सुरू; आरे ते सिद्धिविनायक अवघ्या 34 मिनिटांत, 60 रूपयांत गाठणं होणार शक्य

Mumbai Mantralaya Access: मुंबईमधील मंत्रालयात प्रवेशासाठी Digi Pravesh ॲपवर नोंदणी अनिवार्य; स्लॉट बुक करून रांगेशिवाय घेता येईल प्रवेश

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement