Mumbai IIM: मुंबईला मिळणार आयआयएम? पाच सदस्यीय समितीचा अहवाल ठरणार महत्त्वपूर्ण
त्यासाठी पाच सदस्यीय एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. बीएसईचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अहालाबाद विद्यापीठाचे कुलगुरु आशिषकुमार चौहान यांच्या अध्यक्षतेकाली ही समिती काम करणार आहे.
मुंबई शहरात एखादी आयआयएम (IIM) सारखी संस्था असावी यासाठी केंद्र सरकार विचार करत आहे. त्यासाठी पाच सदस्यीय एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. बीएसईचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अहालाबाद विद्यापीठाचे कुलगुरु आशिषकुमार चौहान यांच्या अध्यक्षतेकाली ही समिती काम करणार आहे. ही समिती नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ इंडस्ट्रीअल इंजिनिअरींग, मुंबईचे रुपांतर आयआयएम मध्ये रुपांतरत करण्याबाबत विचार करणार आहे.
मुंबई हे शहर महाराष्ट्राची राजधानी आहे. परंतू, त्यासोबतच हे शहर भारताची आर्थिक राजधानीसुद्धा आहे. त्यामुळे अशा शहरात एखादी आयआयएमसारखी संस्था असावी असी नेहमीच गरज भासत असते. मोठमोठे उद्योजकही अनेकदा राष्ट्रीय स्तरावरील संस्थेची मागणी करत असतात. त्यामुळे यावर गांभीर्याने विचार व्हावा असे सरकारला वाटत आहे. त्यामुळे त्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत.
भारत सरकारने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग (NITIE) मुंबई ही संस्था 1963 मध्ये स्थापन केली. ही एक स्वायत्त संस्था आहे. शिक्षण क्षेत्राबाबत असलेल्या सोसायटी नोंदणी कायदा 1860 अन्वये या संस्थेला सोसायटी म्हणून नोंदले गेले आहे. ही संस्था अभियांत्रिकी व्यवस्थापन आणि व्यवस्थापन विज्ञान क्षेत्रासोबतच औद्योगिक अभियांत्रिकी क्षेत्रातील तरुणांनाही शिक्षण देते मार्गदर्शन करते. देशाच्या आर्थिक उन्नतीला हातभार लावण्यासाठी हे तरुण तयार व्हावेत यासाठी ही संस्था प्रयत्न करते. ही संस्था आयआयएमच्या कक्षेत यावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत.