मुंबई: सीप्झ परिसरात बिबट्याची दहशत; दोन कुत्र्यांवर जीवघेणा हल्ला

सीप्झ परिसरातील जोगेश्वरी-विक्रोळी परिसरात असलेल्या लिंक रोडवरील टेलिकॉम कंपनी नजिकची आहे.

Leopard | Representational image (Photo credits: Wikimedia Commons)

मुंबईच्या अंधेरी पूर्व भागामध्ये आज सीप्झ परिसरामध्ये एक बिबट्या दिसल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या बिबट्याने दोन कुत्र्यांवरही हल्ला केला आहे. दरम्यान ही घटना सीप्झ परिसरातील जोगेश्वरी-विक्रोळी परिसरात असलेल्या लिंक रोडवरील टेलिकॉम कंपनी नजिकची आहे. या हल्ल्याची गह्टना सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाली आहे. या घटनेनंतर वनविभागाच्या अधिकार्‍यांना सूचित करण्यात आले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. औरंगाबाद: सिडको N1 परिसरातील बिबट्याची दहशत 6 तासांनी संपली; वनअधिकार्‍यांनी डार्ट मारून केले बेशुद्ध

मुंबईच्या मानवीवस्तीमध्ये बिबट्या घुसण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. यापूर्वी मुंबईच्या अनेक ठिकाणी अशाप्रकारे बिबट्या घुसल्याचं समोर आले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्येही सिडको वसाहतीमध्ये बिबट्या घुसला होता. तेव्हा सहा तासांच्या मेहनतीनंतर बिबट्याला पकडण्यात यश आलं आहे. काही महिन्यांपूर्वी ठाणे परिसरात शॉपिंग मॉल जवळ एका हॉटेल परिसरात बिबट्या दिसला होता. या बिबट्याला पकडण्यासाठीदेखील वनविभगाचे अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जून महिन्यात एका बिबट्याने झडप मारून नऊ महिन्याच्या एका बालकाचा जीव घेतला होता. शिंदेवाडी ठाण्यात पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये गदबोरी गावातील स्वराज गुरनुले घरी झोपले होते. त्यावेळेस 3 च्या सुमारास बिबट्या घरात घुसला आणि बाळाला फरफटत नेले. या बाळाच्या शरीराचे तुकडे सापडले आहेत. बाळाला सुमारे 2 किमी आत जंगलात बिबट्याला खेचून नेले.