Ladies Special Suburban Trains On CR: मुंबई लोकलच्या पश्चिम रेल्वे पाठोपाठ मध्य रेल्वे मार्गावरही लेडीज स्पेशल 2 फेर्या धावणार; इथे पहा वेळापत्रक
आज मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीपासून 1ऑक्टोबर पासून कल्याण ते सीएसएमटी या मार्गावर लेडीज स्पेशल ट्रेन (Ladies Special Train) धावेल.
मुंबईमध्ये मिशन बिगिन अगेन अंतर्गत हळूहळू व्यवहार सुरू झाले आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसोबत आता खाजगी आस्थापनांमधील कर्मचारी देखील कामावर परतत आहेत. त्यामुळे रस्त्यांवर आता वाहतूक कोंडी पहायला मिळत आहे. दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कामावर रेल्वेतून प्रवास करत असले तरीही अनेक रेल्वे फेर्यांमध्ये कामाच्या वेळी सकाळ-संध्याकाळी मोठी गर्दी पहायला मिळत आहे. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचे तीन-तेरा वाजत असल्याने मध्य रेल्वेने (Central Railway) मेन लाईन (Main Line) आणि ट्रान्स हार्बर (Trans Harbour line) मार्गावर रेल्वेच्या फेर्या वाढवल्या आहेत. यामध्ये मध्य रेल्वे मार्गावर 2 लेडीज स्पेशल फेर्या देखील चालवल्या जाणार आहेत. आज मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीपासून 1ऑक्टोबर पासून कल्याण ते सीएसएमटी या मार्गावर लेडीज स्पेशल ट्रेन (Ladies Special Train) धावेल.
मध्य रेल्वे वाढती गर्दी पाहता 1ऑक्टोबर पासून 8 अतिरिक्त फेर्या चालवणार आहे. यामध्ये 4 मेन लाईनवर तर 4 ट्रान्स हार्बर मार्गावर चालवल्या जातील. यामध्येच 2 लेडीज स्पेशल ट्रेन असतील. सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता सामान्यांसाठी रेल्वे प्रवास अद्याप खुला केलेला नाही. या विशेष रेल्वे फेर्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि राज्य सरकारने मुभा दिलेल्या प्रवाशांसाठी चालवल्या जातील.
मध्य रेल्वे कडून आता एकूण दिवसाला 431 फेर्या चालवल्या जाणार आहेत. यामध्ये लेडीज स्पेशल रेल्वे फेर्या सकाळ-संध्याकाळ असतील. सकाळी 8.25 ला कल्याण वरून सुटणारी लेडीज स्पेशल 9.34 ला सीएसएमटीला पोहचेल तर संध्याकाळी सीएसएमटीवरून 17.35 ला सुटणारी लोकल कल्याणला 18.44 ला पोहचेल. दरम्यान ठाणे-पनवेल देखील ट्रेन वाढवण्यात आल्या आहेत. Mumbai Local Updates: पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून विरार- चर्चगेट- विरार मार्गावर 2 महिला विशेष रेल्वे फेर्या सुरू; इथे पहा वेळापत्रक.
मध्य रेल्वेकडून चालवल्या जाणार्या या मुंबई लोकलच्या विशेष गाड्यांमध्ये केवळ अत्यावशयक सेवेतील कर्मचार्यांना प्रवासाची मुभा आहे. त्यांना देखील मास्क घालून, सोशल डिस्टन्सिंग पाळत प्रवास करण्याचं आवाहन रेल्वे कडून करण्यात आले आहे. तसेच चढताना, उतरल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून जारी केलेल्या SOP चं पालन करणं त्यांच्यासाठी अनिवार्य असेल.