मुंबई: महिला पोलिसाकडे पाहून अश्लील चाळे करणाऱ्या कॉन्स्टेबलला अटक

मुंबईत (Mumbai) एका महिला पोलिसाकडे पाहून अश्लील चाळे करणाऱ्या कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबईत (Mumbai) एका महिला पोलिसाकडे पाहून अश्लील चाळे करणाऱ्या कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. तर आरोपी आणि पीडित महिला पोलिस हे दोघे कुर्ला येथील एकाच वस्तीत राहत असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

पीडित महिला ज्या इमारतीत राहते त्याच्या बाजूच्या इमारतीमध्ये आरोपी राहतो. तर महिला ही तिच्या घराच्या बालकीत उभी असताना आरोपीमने तिच्याकडे पाहून अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. तसेच त्याने आपल्या अंगावरील कपडे उतरवल्याचा प्रकारसुद्धा केला असल्याचे पीडित महिलेने सांगितले आहे.(औरंगाबाद येथील महिला नगरसेविकेवर पुणे येथे बलात्कार, चार जणांवर गुन्हा दाखल)

या प्रकरणी तातडीने पीडित महिलेने नियंत्रण कक्षाला याबद्दल माहिती दिली. नेहरु नगर पोलीस स्थानकात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी गेल्या तीन दिवसांपासून कामावर आला नसल्याचे माहिती पोलिसांनी दिली.