कोहिनुर मिल प्रकरणी राज ठाकरे यांना ईडी कडून नोटीस, भाजपच्या 'हिटलरशाही' विरोधात आवाज उठवणार संदिप देशपांडे यांची प्रतिक्रिया
मुंबईतील (Mumbai) दादर शिवाजी पार्क जवळील कोहिनुर स्क्वेअर (Kohinoor Square) प्रकरणी मनसे (MNS) अध्यक्ष राज (Raj Thackeray) ठाकरे यांना ईडी (ED) कडून नोटीस पाठवण्यात आली आहे.
मुंबईतील (Mumbai) दादर शिवाजी पार्क जवळील कोहिनुर स्क्वेअर (Kohinoor Square) प्रकरणी मनसे (MNS) अध्यक्ष राज (Raj Thackeray) ठाकरे यांना ईडी (ED) कडून नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना 22 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
कोहिनूर सीटीएनलमध्ये आयएल अॅन्ड एफएस ग्रुपच्या कर्ज आणि 860 कोटी रुपये यामध्ये गुंतवणूक केल्याने ईडीकडून याचा तपास केला जात आहे. शिवसेना पक्षाचे जेष्ठ नेते मनोहर जोशी यांचा मुलागा उन्मेश याने ही कंपनी सुरु केली. तसेच कोहिनूर मधील मिल क्रमांक 3 विकत घेण्यासाठी राज ठाकरे विकत घेण्याच्या तयारीत होते.
कोहिनुर मिल क्रमांक 3 च्या जागेचा काही भागाचा लिलाव करण्यात आला होता. 421 कोटी रुपयांना या जागेचा लिलाव केला गेला. लिलाव केल्यानंतर ही जागा मनोहर जोशी यांच्या मुलाने घेतली. यामध्ये राज ठाकरे, राजन शिरोडकर आणि मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेश हे तिघे समान भागीदार होते. या मिलच्या जागेची खरेदी करताना उन्मेश याने आयएल अॅण्ड एफएलस सोबत घेतले होते. तसेच उन्मेश याला सुद्धा ईडी कडून समन्स पाठवण्यात आले आहेत.(मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली ममता दीदींची भेट, EVM मशीन विरोधी मोर्चा साठी मुंबईत येण्याची केली विनंती)
मात्र कोहिनुर प्रकरणी पाठवण्यात आलेल्या ईडी नोटीसवरुन मनसे प्रवक्ता संदिप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी राज ठाकरे यांचे समर्थन केले आहे. मीडियाला दिलेल्या वृत्तानुसार राज ठाकरे यांच्यावर फक्त दबाब आणला जात असल्याची टीका केली आहे. अद्याप भाजपच्या एकाही बड्या नेत्यावर गेल्या 5-6 वर्षात ईडीने कोणतीही चौकशी केलेली नाही. या प्रकारवरुन आम्ही सुरु असलेल्या हिटलरशाही विरोधात आवाज उठवत राहणार असे विधान केले आहे.
मिल क्रमांम 3 साठी 421 कोटी रुपयांमधील 50 टक्के रक्कम ही आयएल अॅण्डने भरले. मात्र काही वर्षांनी यामधील 50 टक्के हिस्सा त्यांनी 90 कोटी रुपयांना विकला. त्यानंतर 2008 मध्ये राज ठाकरे यांनी 90 कोटीचे शेअर्स विकले. त्यामुळे अद्याप या प्रकरणाची ईडी कडून चौकशी सुरुच आहे. तसेच आता आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांनी ईव्हीएमवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यामुळे भाजप-शिवसेना युतीला बसण्याची शक्यता आहे.