आज पश्चिम, हार्बर रेल्वे मार्गावर जम्बो ब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक
तर पश्चिम मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान आणि हार्बर मार्गावर सकाळी 11 ते 4.30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.
Mumbai MegaBlock: पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी (10 फेब्रुवारी) जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान आणि हार्बर मार्गावर सकाळी 11 ते 4.30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. तसेच सकाळी 11.40 मिनिटांपासून ते 4.10 मिनिटांपर्यंत सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रेच्या दिशेला जाणारी एकही लोकल धावणार नाही. सकाळी 11.10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4.10 पर्यंत चुन्नाभट्टी व वांद्रे ते सीएसएमटीच्या दिशेने एकही लोकल धावणार नाही आहे.
वडाळा रोड, वाशी, बेलापूर, पनवेल यांच्या दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल 11.34 ते 4.23 पर्यंत रद्द केल्या आहेत. तर पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव या स्थानकादरम्यान सकाळी 10.35 ते 3.35 पर्यंत दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील गाड्या रद्द होणार असून त्या धिम्या मार्गावरुन धावणार आहेत.
कल्याण- टिटवाळा दरम्यान सकाळी 10.45 वा. पासून दुपारी 2.00 वा. पर्यंत शहाड स्थानक एफ.ओ.बी करिता विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. तर पॉवर ब्लॉक दरम्यान अनेक पायाभूत कामे केली जातील. त्यानुसारच प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले.