मुंबई: 11 वर्षीय मुलाने गिळला कोरडा सेल, जसलोक रुग्णालयात शस्त्रक्रियेला यश

मुंबई (Mumbai) मधील प्रसिद्ध जसलोक रुग्णालयात (Jaslok Hospital) एका 11 वर्षीय तरुणाने गिळलेला कोरडा सेल फुफ्फुसातून बाहेर काढण्यास डॉक्टरांना यश आले आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-File Image)

मुंबई (Mumbai)  मधील प्रसिद्ध जसलोक रुग्णालयात (Jaslok Hospital) एका 11 वर्षीय तरुणाने गिळलेला कोरडा सेल फुफ्फुसातून बाहेर काढण्यास डॉक्टरांना यश आले आहे. तर मुलाने सेल चुकून गिळल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच सेल फुफ्फुसात अडकल्याने त्याला रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मुलाने गिळलेला सेल फुफ्फुसात अडकून राहिल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे उपचार तातडीने करणे अत्यंत गरजेचे असल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया करताना मुलाचे वय लहान असल्यामुळे भीती होती. परंतु ती यशस्वीरित्या पार पडली असल्याचे जसलोक रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे.(अमरावती: प्रियकराच्या गुप्तांगावर प्रेयसीने भिरकावला दगड; पीडिताच्या आईची पोलिसात धाव; रक्तबंबाळ तरुणावर ICU मध्ये उपचार)

तर सेल गिळल्याने त्यामधील अॅसिड बाहेर येऊन पसरत असल्याचे डॉक्टरांना दिसून आले. तर या अॅसिडमुळे मुलाच्या आरोग्याला अधिक धोका पोहचू नये यासाठी तातडीने त्याच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली. तर मुलाची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्यानंतर अवघ्या 24 तासात त्याला घरी सोडण्यात आले आहे.



संबंधित बातम्या

NZ vs ENG 3rd Test 2024 Day 4 Live Streaming: न्यूझीलंड विजयापासून 8 विकेट दूर, जाणून घ्या चौथ्या दिवसाचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहायचे

PAK vs SA 1st ODI 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या वनडेच्या मिनी बॅटलमध्ये होणार चुरशीची स्पर्धा, हे खेळाडू सामन्याचा निर्णय बदलू शकतात

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील