Mumbai-Jalna Vande Bharat Express; भारतीय रेल्वे लवकरच सुरु करणार मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेस; जाणून घ्या सविस्तर

जालना-मनमाड सेक्शनवर ट्रॅक चाचणी सुरू आहे. या ट्रेनचा सरासरी वेग ताशी 130 किमी असेल.

Vande Bharat Train | (File Image)

भारतीय रेल्वे मुंबई-जालना दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस (Mumbai-Jalna Vande Bharat Express) सुरू करण्याचा विचार करत आहे. सीएसएमटी येथून सुटणारी ही चौथी वंदे भारत ट्रेन असेल. मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे पाठवलेला हा प्रस्ताव सध्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. प्रस्तावानुसार प्रस्तावित वंदे भारत ट्रेन दोन्ही दिशांना ठाणे, नाशिक, मनमाड आणि औरंगाबाद स्थानकावर थांबेल. प्रस्तावित वंदे भारत ट्रेन सीएसएमटीवरून शुक्रवार आणि जालना येथून शनिवार वगळून आठवड्यातून सहा दिवस धावणे अपेक्षित आहे.

प्रस्तावित वेळापत्रकात जालना ते सीएसएमटी असा 6.50 तासांचा जलद प्रवास असेल. ही गाडी पहाटे 5.05 वाजता सुटेल आणि 11.55 वाजता सीएसएमटीला पोहोचेल. त्यानंतर सीएसएमटी ते जालना हा परतीचा प्रवास दुपारी 1.10 वाजता सुरू होणार असून, जालन्याला रात्री 7.30 वाजता पोहोचणार आहे. (हेही वाचा: Mahalaxmi Saras Exhibition 2024: मुंबईमध्ये 26 डिसेंबर ते 8 जानेवारी दरम्यान महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन; मिळणार खरेदीची व ग्रामीण भागातील चव चाखण्याची संधी)

मराठवाड्यातील ही पहिली वंदे भारत एक्स्प्रेस जालना आणि मुंबई दरम्यान, शक्यतो औरंगाबाद रेल्वे स्टेशन मार्गे कनेक्टिव्हिटी वाढवेल अशी अपेक्षा आहे. परिचयाची तारीख अद्याप निश्चित झालेली नसली तरी, रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सुचवले आहे की ही सेवा काही आठवड्यांत सुरू होईल. या ट्रेनच्या तिकीट दराबद्दल बोलायचे तर, त्याबाबत ठोस माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र तिकीटाचा दर 1000 ते 1200 रुपये इतका असू शकतो, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई दरम्यान सुधारित रेल्वे कनेक्टिव्हिटीची दीर्घकालीन मागणी पूर्ण करण्याच्या क्षमतेमध्ये या नवीन एक्स्प्रेसचे महत्त्व आहे. जालना-मनमाड सेक्शनवर ट्रॅक चाचणी सुरू आहे. या ट्रेनचा सरासरी वेग ताशी 130 किमी असेल. प्रस्तावित मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेसमुळे सोलापूर-मुंबई वंदे भारत आणि सहा लोकल सेवांसह 13 लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची अपेक्षा आहे. मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाला लिहिलेल्या पत्रात नवीन एक्स्प्रेसला सामावून घेण्यासाठी समायोजन सुचवले आहे, ज्यामुळे सहा उपनगरीय गाड्यांमधील प्रवाशांना तीन ते पाच मिनिटे उशीर होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही, असे सीआरने म्हटले आहे.