Mercer's 2020 Cost of Living Survey: देशात मुंबई ठरले बाहेरच्या लोकांसाठी Most Expensive City, तर जगात Hong Kong ने मारली बाजी; पहा जगातील Top 10 महागडी शहरे
देशाच्या आर्थिक राजधानीचे हे शहर प्रत्येकासाठीच एक ड्रीम सिटी आहे. इथे बाहेरून येणारा प्रत्येकजणच डोळ्यात मोठी स्वप्ने घेऊन येत असतो, मात्र शहरातील महागाईमुळे कित्येक लोकांना हे शहर सोडावे लागते.
मुंबई (Mumbai)... देशाच्या आर्थिक राजधानीचे हे शहर प्रत्येकासाठीच एक ड्रीम सिटी आहे. इथे बाहेरून येणारा प्रत्येकजणच डोळ्यात मोठी स्वप्ने घेऊन येत असतो, मात्र शहरातील महागाईमुळे कित्येक लोकांना हे शहर सोडावे लागते. एका सर्वेक्षणातूनही ही स्थिती समोर आली आहे. Mercer च्या 2020 Cost of Living Survey नुसार बाहेरील लोकांसाठी मुंबई हे देशातील सर्वाधिक महागडे शहर (Most Expensive City in India for Expats) ठरले आहे. जीवनावश्यक खर्चाच्या (Cost of Living) बाबतीत मुंबईने दिल्ली व बंगळूरूलाही मागे टाकले आहे. यासह जगामध्ये हाँगकाँग हे सर्वात महागडे शहर ठरले आहे.
मुंबई हे जागतिक स्तरावर परदेशी लोकांसाठी 60 व्या क्रमांकाचे महागडे शहर आहे, तर आशियामध्ये हे 19 वे महागडे शहर ठरले आहे. मुंबईनंतर नवी दिल्ली (जागतिक स्तरावर 101 वे) आणि चेन्नई (जागतिक स्तरावर 143 वे) चा नंबर लागतो. या सर्वेक्षणानुसार देशात बेंगळुरू (171) आणि कोलकाता (185) ही सर्वात कमी महागडी शहरे ठरली आहेत. जागतिक क्रमवारीत हाँगकाँगने अव्वल स्थान पटकावले, त्यानंतर अश्गाबत (तुर्कमेनिस्तान) दुसर्या क्रमांकावर आहे. जपानचे टोकियो आणि स्वित्झर्लंडचे झ्यूरिक अनुक्रमे तिसर्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे, तर सिंगापूर पाचव्या क्रमांकावर आहे. (हेही वाचा: ताजमहाल नाही, तर मुंबईची झोपडपट्टी धारावी ठरले आशियातील लोकप्रिय पर्यटन स्थळ, जाणून घ्या संपूर्ण यादी)
जागतिक क्रमवारीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळविणारी इतर शहरे म्हणजे अमेरिकेचे न्यूयॉर्क शहर सहाव्या स्थानावर, चीनचे शांघाय सातव्या क्रमांकावर, स्वित्झर्लंडचे बर्न आणि जिनिव्हा अनुक्रमे आठव्या आणि नवव्या स्थानावर असून बीजिंग दहाव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे ट्युनिशियामधील ट्युनिस, विन्डहोक (नामीबिया), ताश्कंद (उझबेकिस्तान), बिश्केक (किर्गिस्तान) आणि कराची (पाकिस्तान) यांना जगातील सर्वात कमी महागड्या शहरांमध्ये शेवटचे स्थान मिळाले आहे.
या वर्षाच्या रँकिंगमध्ये पाच खंडातील 209 शहरे समाविष्ट आहेत. शहरातील घरे, वाहतूक, अन्न, वस्त्र, घरगुती वस्तू आणि करमणुकीसह प्रत्येक ठिकाणच्या 200 पेक्षा जास्त वस्तूंची तुलनात्मक किंमत लक्षात घेऊन हे सर्वेक्षण केले आहे. हे सर्वेक्षण बहुराष्ट्रीय कंपन्यांना त्यांच्या इतर देशांत प्रवास करणाऱ्या कर्मचार्यांche योग्य मानधन निश्चित करण्यात मदत करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.