Mumbai: BMC केंद्रांव्यतिरिक्त आता 29 अतिरिक्त खाजगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी; जाणून घ्या यादी

60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व 20 गंभीर आजार असलेल्या 45 वर्षांवरील लोकांना ही लस दिली जात आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाची संख्या वाढत आहे, म्हणूनच बीएमसीनेही (BMC) लसीकरणासाठी कंबर कसली आहे

Coronavirus Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

देशात कोरोना लसीकरणाचा (COVID-19 Vaccination) दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरू झाला आहे. 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व 20 गंभीर आजार असलेल्या 45 वर्षांवरील लोकांना ही लस दिली जात आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाची संख्या वाढत आहे, म्हणूनच बीएमसीनेही (BMC) लसीकरणासाठी कंबर कसली आहे. महानगरपालिका/शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण विनामूल्य आहे. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांमधील प्रत्येक डोससाठी 250 रुपये शुल्क आकारले जाईल. लससाठी 150 रुपये आणि सर्व्हिस चार्जसाठी 100 रुपये द्यावे लागतील. आता मुंबईमध्ये बीएमसी केंद्रांव्यतिरिक्त 29 खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना व्हायरस लसीकरण मोहीम राबविण्यास परवानगी देण्यात आली आहे.

याबाबत महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे विनंती केली होती की, लसीकरणासाठी भारत सरकारने विहित केलेल्या चार निकषांची पूर्तता करणाऱ्या, 200 पेक्षा जास्त खाटा असणाऱ्या मल्टीस्पेशालिटी 29 खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी देण्यात यावी. याबाबत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या प्रकरणाची तपासणी केली व अशा 29 रुग्णालयांची सूची जाहीर केली आहे, जिथे ही लसीकरण मोहीम राबवली जाऊ शकते. या सर्व रुग्णालयांनी स्वतःहून कोरोना व्हायरस लसीकरणामध्ये सामील होण्यासाठी रस दाखवला होता. (हेही वाचा: शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे शासनाची प्राथमिकता; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिला विश्वास)

29 रुग्णालयांची यादी -

दरम्यान, मुंबईत आज आणखी नवीन 849 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 2 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईमध्ये एकूण सक्रिय रुग्णसंख्या 9,633 इतकी आहे. आज मुंबईमध्ये 903 रुग्ण बरे झाले आहेत.