Mumbai-Goa RoPAX Ferry Service: मुंबई गोवा दरम्यान RoPAX फेरी सर्व्हिस सुरू होणार; कार ही घेऊन जाता येणार

Ferry Wharf in Mazgaon (Mumbai) ते Mormugao Port Authority (Goa) पर्यंत RoPAX सेवा चालवण्याची योजना आहे.

M2M Ferries | Instagram @M2M Ferries

मुंबई-गोवा प्रवास आता अधिक अपग्रेड होणार आहे. M2M Ferries ज्याची ओळख Ro-Ro (roll-on, roll-off) म्हणून आहे आता त्यांच्याकडून Mumbai-Goa RoPAX ferry service सुरू करण्याच्या तयारीत आहे. या रो पॅक्समधून गोव्याला आता प्रवासी त्यांची कार देखील घेऊन जाता येणार आहेत. M2M फेरीने इटलीमधून 15 वर्ष जुने RoPAX जहाज विकत घेतले आहे, ज्याची सध्या मुंबईत देखभाल सुरू आहे. फेरी तयार झाल्यानंतर मुंबई-गोवा प्रवास अवघ्या साडेसहा तासांत पूर्ण करणे अपेक्षित आहे. कंपनीने ऑपरेशन्स सुरू करण्यासाठी शिपिंग महासंचालक आणि इतर प्राधिकरणांकडून आवश्यक मंजुरीसाठी अर्ज केला आहे.

Hindustan Times च्या माहितीनुसार, M2M च्या अधिकाऱ्याने शेअर केले, “आमची योजना Ferry Wharf in Mazgaon (Mumbai) ते Mormugao Port Authority (Goa) पर्यंत RoPAX सेवा चालवण्याची आहे. चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी पणजी येथे डॉकिंगला परवानगी देण्यासाठी आम्ही गोवा सरकारशी चर्चा करत आहोत.

नवीन RoPAX जहाजात 620 प्रवासी आणि 60 कार समावू शकतात. भाडे रचना अद्याप ठरलेली नसताना, कंपनीला आशा आहे की केंद्र सरकार इंधन आणि कर सवलतींवर सबसिडी देईल ज्यामुळे सेवा अधिक परवडणारी असेल.

मुंबई-गोवा RoPAX फेरी ही गुजरातमधील हजीरा आणि घोघा दरम्यान धावणार्‍या अन्य भारतातील इतर समान सेवांमध्ये सामील होईल. दरम्यान, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड (MMB) रायगड किनाऱ्यालगत काशीद, रेवदंडा आणि दिघी येथे रो-रो सेवेसाठी नवीन जेटी बांधत आहे. ते सुमारे १८ महिन्यांत तयार होण्याची अपेक्षा आहे. दिघी या आगामी औद्योगिक शहराला जोडण्यासाठी राज्य सरकार रो-रो सेवेचीही योजना करत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now