HSC Board Exam 2019 Results: आयपॅडवर 12 वी ची परीक्षा देत Nishka Hosangady हिने मिळवले 73%

मुंबईच्या सोफिया कॉलेजमधील निष्का होसनगडी (Nishka Hosangady) या विद्यार्थीनीने पहिल्यांदाच आयपॅडचा वापर करत बारावीची परीक्षा दिली.

HSC Exam with I Pad (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्र बोर्डाचे बारावीचे निकाल आज जाहीर झाले असून यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुंबईच्या सोफिया कॉलेजमधील निष्का होसनगडी (Nishka Hosangady) या विद्यार्थीनीने पहिल्यांदाच आयपॅडचा वापर करत बारावीची परीक्षा दिली होती. निष्का Dystonia या एका दुर्मिळ अनुवंशिक आजाराने पीडित आहे. तिला बोलणं आणि हाताची हालचाल करणं यामध्ये त्रास होत असल्याने तिने आयपॅडचा पर्याय परीक्षा देण्यासाठी निवडला होता. मात्र या आजारावर आणि त्यामुळे येणाऱ्या सर्व आव्हानांवर मात करत तिने 73% गुण मिळवले आहेत.

निष्का हिला वयाच्या आठव्या वर्षी निष्काला एका दुर्मिळ आजाराने गाठलं. त्यानंतर शिक्षणातील दोन वर्ष वाया गेली. पुढे स्पेशल स्कूलमध्ये प्रवेश मिळवत NIOS board माध्यमातून परिक्षा दिल्या. अकरावीला तिने सोफिया कॉलेजमध्ये आर्ट्स शाखेत प्रवेश मिळवला.

तिच्या आजारामुळे निष्काच्या पालकांनी बोर्डाशी संपर्क साधून तिला आयपॅडवर बारावीची परीक्षा देण्याची परवानगी मिळवली. निष्का डाव्या हाताच्या एका बोटाने आयपॅडवर उत्तर लिहिले आणि त्यानंतर तिच्यासोबतचा मदतनीसने उत्तरपत्रिकेवर उत्तर लिहिले. (मुंबई मध्ये Nishka Hosangady देणार iPad वर बारावीची परीक्षा)

यंदा बारावीच्या परीक्षेसाठी प्रथमच 22 प्रकारचे दिव्यांग विद्यार्थी होते. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 92.60 टक्के इतका लागला आहे.