आज मुंबईतील मानाच्या 21 गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांचे आगमन, पोलीस प्रशासन सज्ज

चिंचपोकळीचा चिंतामणी सह काही प्रमुख गणपती मंडळांच्या नंतर आज, म्हणजे 18 ऑगस्टला सुद्धा मुंबईतील 21 हुन अधिक मानाच्या गणपती मंडळाच्या बाप्पांचा आगमन सोहळा पार पडणार आहे. आगमन मिरवणुकीत होणाऱ्या हुल्लडबाजीचा प्रत्यय घेतल्यावर आज मुंबई पोलिसांसह प्रशासनाने देखील व्यवस्थापनासाठी कंबर कसली आहे.

Ganpati Aagman Sohla (Photo Credits: Instagram)

मुंबईसह देशभरात इतकंच नव्हे तर विदेशात देखील ज्या सणाची सर्वाधिक चर्चा असते असा गणेशोत्सव (Ganpati Festival) आता अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. या निमित्ताने मुंबईतील गणपती मंडळे लाडक्या बाप्पाच्या आगमनाची पुरेपूर तयारी करत आहे. चिंचपोकळीचा चिंतामणी (Chinchpolicha Chintamani)  सह काही प्रमुख गणपती मंडळांच्या नंतर आज, म्हणजे 18 ऑगस्टला सुद्धा मुंबईतील 21 हुन अधिक मानाच्या गणपती मंडळाच्या बाप्पांचा आगमन सोहळा पार पडणार आहे. लालबाग (Lalbaug)-परळ (Parel)  विभागातील गणेशमूर्ती कार्यशाळेतून आज बाप्पा आपापल्या मंडपाकडे रवाना होणार आहेत. दरम्यान मागील काही घटनांमध्ये आगमन मिरवणुकीत होणाऱ्या हुल्लडबाजीचा प्रत्यय घेतल्यावर आज मुंबई पोलिसांसह (Mumbai Police)  प्रशासनाने देखील व्यवस्थापनासाठी कंबर कसली आहे. (गणपतीच्या काळात फेरीवाल्यांची मनमानी चालणार नाही; पालिकेने फलक लावून दिला कारवाईचा इशारा)

आज, लालबाग-परळ-करीरोड विभागातील मुंबईचा सम्राट, खेतवाडीचा विघ्नहर्ता, अखिल चंदनवाडीचा गोड गणपती, कामाठीपुराचा शुभंकर, ग्रँट रोडचा महागणपती, परळचा महाराजा, खेतवाडी 11 वी गल्ली, खेतवाडीचा राजा-महाराजा, अँटॉप  हिलचा महाराजा, कुंभारवाड्याचा गणराज, खेतवाडी 7 वी गल्ली, कुंभारवाड्याचा विघ्नहर्ता, ग्रँटरोडचा वरदविनायक, फोर्टचा चिंतामणी, विलेपार्लेचा एकदंत, मुंबादेवीचा गणराज, करीरोडचा कैवारी, सुंदरबागचा राजा, मलबार हिलचा राजा, मुंबईचा कृपाळू, अभ्युदय नगरचा गणराज, यांच्यासह अनेक मंडळांचे बाप्पा मंडपांकडे मार्गक्रमण करणार आहेत. यामुळे निश्चितच आज मुंबईतील रस्त्यांवर भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळू शकते.पहा चिंचपोकळीचा चिंतामणी पाटपूजन सोहळा 2019 ची झलक

दरम्यान, मुंबईत ठिकठिकाणी मेट्रो प्रकल्पांच्या कामानिमित्त रस्त्यावर खोदकाम करण्यात आले आहे, त्यामुळे आगमन सोहळ्यात बाधा येऊ नये म्हणून पालिकेने काळजी घ्यायला लागणार आहे. तसेच धोकादायक उड्डाण पुलांवर 16 टन पेक्षा अधिक जोर येऊ नये यासाठी मिरवणुकीच्या गर्दीचे योग्य नियोजन करण्याचा मुंबई पोलिसांसह वाहतूक पोलिसांचा प्रयत्न असेल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now