मुंबईतील फूटपाथांवरील 142 रहिवाशांना मिळणार हक्काची घरं

ज्यात 142 रहिवाशांना हक्काची पक्की घरे मिळणार आहेत.

Mumbai Slum (Photo Credits: Wiki Commons)

मुंबईतील वाढती लोकसंख्या लक्षात घेता मुंबईकरांना हक्काची घरे बांधण्याची एकतर जागा मिळत नाही, नाही तर त्याच्या किंमती त्यांच्या खिशाला परवडण्यासारखी नसते. म्हणून आज मुंबईच्या फूटपाथावर देखील आपल्याला लाखो घरे बांधलेली पाहायला मिळतायत ज्यात असंख्य कुटूंबे वास्तव्यास आहेत. पण फूटपाथावरील अशी अनधिकृत घरे जितकी धोकादायक असतात तितकीच त्या वाहतुकीस अडथळा निर्माण करण्यास जबाबदार असतात. म्हणून अशा फूटपाथावर राहणा-या हक्काची घरे बनवून देण्याचा योजना पालिका आखत आहे. ज्यात 142 रहिवाशांना हक्काची पक्की घरे मिळणार आहेत.

यात मुंबई सेंट्रल येथील मॉरलॅण्ड रोड, मौलाना अब्दुल कलाम आझाद रोड, पीरखान स्ट्रीट आणि मराठा मंदिर परिसरातील फूटपाथवर ४० वर्षांपासून राहत असलेल्या सुमारे १४२ रहिवाशांना आता हक्काचे घर मिळणार आहे. या रहिवाशांना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांच्या हस्ते महात्मा गांधी पथक्रांती योजनेअंतर्गत गुरुवारी घरांचे देकार पत्र (अॅलॉटमेंट लेटर) देण्यात आले.

हेही वाचा- Monsoon Update: मुंबईतील नाल्यालगतच्या 4 मजली झोपड्या हटविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबईतील या महत्त्वाच्या जागांचा विचार केला तर येथे 517 झोपड्या असून कित्येक कुटूंबे रस्त्यावरच आपला संसार थाटून वास्तव्यास आहेत. मात्र यामुळे येथील वाहतुकीवर परिणाम होत असून या झोपड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.

म.टा. ने दिलेल्या बातमीनुसार, समाजवादी पक्षाचे नेते रईस शेख यांच्या सततच्या पाठपुराव्या नंतर 517 झोपड्यांपैकी 230 झोपड्यांची हक्काच्या घरासाठी पात्रता निश्चित झाली आहे. तर 142 पात्र रहिवाशांना हक्काची घरे मिळणार आहेत.