IPL Auction 2025 Live

Mumbai: दुबईहून येणाऱ्यांना 7 दिवस होमक्वारंटाइन राहणे अनिवार्य

त्यामुळे मुंबई महापालिकेने शुक्रवारी दुबईहून आलेल्या सर्व प्रवाशांनी 7 दिवस होमक्वारंटाइन रहाणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे.

Coronavirus Outbreak | (Photo Credit: PTI)

Mumbai: राज्यात कोरोनासह ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये सुद्धा झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने शुक्रवारी दुबईहून आलेल्या सर्व प्रवाशांनी 7 दिवस होमक्वारंटाइन रहाणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच मुंबईत राहणाऱ्या आणि पूर्णपणे लसीकरण झालेल्या नागरिकांना विमानतळावर आरटी-पीसीआर करणे आवश्यक नाही.(Christmas 2021: नाताळसाठी महाराष्ट्र राज्य सरकारची नियमावली जाहीर)

सात दिवसानंतर प्रवाशांची चाचणी निगेटिव्ह आल्यास त्यांनी आणखी पुढील सात दिवस आरोग्यावर लक्ष द्यावे. परंतु त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांना इंस्टिट्युशन क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. तसेच महाराष्ट्राबाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्यांना सार्वजनिक वाहतूकीचा वापर करण्यास मनाई असणार आहे. मात्र अन्य राज्यातून आलेल्यांना कनेक्टिंग फ्लाइटची सुविधा घेता येणार आहे. परंतु विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी त्या प्रवाशांच्या राहत्या ठिकाणच्या येथे ते दुबई येथून आल्याची माहिती द्यावी.(COVID 19 Guidelines For Ahmednagar: अहमदनगर मध्ये 'No Vaccine, No Entry' निर्बंध; सार्वजनिक ठिकाणी फिरण्यासाठी लस बंधनकारक)

अशातच राज्य सरकारकडून ख्रिसम, नवं वर्ष आणि लग्न समारंभ, हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये होणारी गर्दी पाहता नव्या गाइडलाइन्स जाहीर करण्यात आल्या आहेत.  गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोविड19 आणि ओमिक्रॉनच्या रुग्णांचा वाढता आकडा पाहता रात्री 10 वाजता कोविड19 टास्क फोर्स सोबत व्हिडिओ कॉन्फ्रेंन्सिंगच्या माध्यमातून बैठक बोलावली होती. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सातत्याने वाढत असलेल्या ओमिक्रॉनच्या रुग्णांवर लगाम घालण्यासंबंधित मुद्द्यांवर चर्चा केली.