Andheri Fire: मुंबईच्या अंधेरी भागातील लक्ष्मी प्लाझा इमारतीला भीषण आग; पाहा व्हिडिओ

या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या (Fire Engines) घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Andheri Fire (Photo Credit: Twitter)

मुंबईच्या (Mumbai) अंधेरी (Andheri) भागातील लक्ष्मी प्लाझा (Laxmi Plaza Building) इमारतीला भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या (Fire Engines) घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. मात्र, ही आग कशामुळे लागली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु, शार्ट सर्कीटमुळे या इमारतीला आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने, या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडे अकराच्या सुमारास या इमारतीच्या वरच्या मजल्यातील एका प्लॅटला आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत. हे देखील वाचा- Mumbai Fire: मुंबईतील घाटकोपर परिसरातील बांबू गोदामाला भीषण आग

ट्वीट-

याआधी भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसी परिसरातील कपिल रेयॉन कंपनीला गुरुवारी (28 जानेवारी) भीषण आग लागली आहे. तब्बल 11 तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीत कंपनीतील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कोट्यवधी रुपयांची वित्तहानी झाल्याचे समजत आहे.