मुंबई: भेंडीबाजार येथील इस्माईल इमारतीला आग; बचावकार्य सुरु
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या परिसरातील नागरिकांना आग लागल्याचे कळताच त्यांनी आग्नशमनदलाला याची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमनदलाने वेळ न घालवता संबधित ठिकाणी धाव घेतली.
मुंबई (Mumbai) येथील इस्माईल इमारतीला (Ismail building) आज पहाटे आग लागली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या परिसरातील नागरिकांना आग लागल्याचे कळताच त्यांनी आग्नशमनदलाला याची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमनदलाने वेळ न घालवता संबधित ठिकाणी धाव घेतली. अग्निशमनदलाने इमारतीतील रहिवाशांना सुखरुप बाहेर काढले असून अजूनही बचावकार्य सुरुच आहे. ही आग कशामुळे आग लागली, याची अद्याप माहिती समोर आली नाही. मात्र, या घटनेमुळे जवळील परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
एएनआयचे ट्विट-