Mumbai Fire: भायखळा परिसरातील धोबी घाट जवळ आग; सुदैवाने जीवितहानी नाही

मुंबईच्या भायखळा भागात आज (9 मार्च) सकाळी धोबी घाट परिसरात आग लागल्याचं वृत्त आहे. दरम्यान धोबी घाट परिसरात असलेल्या सेक्रेटा स्कूल नजीक असलेल्या झोपडपट्टीजवळ ही लागली आहे.

Mumbai Fire |Photo Credits: Twitter

मुंबईच्या भायखळा भागात आज (9 मार्च) सकाळी धोबी घाट परिसरात आग लागल्याचं वृत्त आहे. दरम्यान धोबी घाट परिसरात असलेल्या सेक्रेटा स्कूल नजीक असलेल्या झोपडपट्टीजवळ ही लागली आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार ही आग आज सकाळी 5.30 च्या सुमारास लागली आहे. आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान आगीचे वृत्त समजताच तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि इतर अत्यावश्यक यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून आता या भागात कुलिंग ऑपरेशन सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान धोबी घाट परिसरात ही आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नाही.

धोबी घाट हा मुंबई शहरातील लोकप्रिय भागांपैकी एक आहे. इथे मोठ्या प्रमाणात कपडे धुतले जातात. त्यामुळे मुंबईमध्ये येणार्‍या अनेक पर्यटकांसाठी ही आकर्षणाची जागा आहे.

ANI Tweet

दरम्यान मागील आठवड्यातच मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात एका कापड्याच्या गोदामाला मोठी आग लागली होती. या आगीमध्येही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र सकाळच्या वेळेस अचानक लागलेल्या आगीमुळे नजीकच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातवरण पसरलं होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement