Mumbai Fire: दक्षिण मुंबई मध्ये Ballard Estate भागात Exchange Building मध्ये आग

दक्षिण मुंबई मध्ये असणार्‍या बलार्ड इस्टेट भागात असणार्‍या एक्सचेंज बिल्डिंगमध्ये (Exchange Building) लागली आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Mumbai Fire: दक्षिण मुंबई मध्ये Ballard Estate भागात Exchange Building मध्ये आग
Fire breaks out in Exchange Building at Ballard Estate | ANI

मुंबई मध्ये आज (21 सप्टेंबर) बलार्ड इस्टेट (Ballard Estate) भागात आग लागल्याचं वृत्त समोर आले आहे. दरम्यान ANI Tweets, नुसार, ही आग दक्षिण मुंबई मध्ये असणार्‍या बलार्ड इस्टेट भागात असणार्‍या एक्सचेंज बिल्डिंगमध्ये (Exchange Building) लागली आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काम सुरू आहे. दरम्यान मिडिया रिपोर्ट्सनुसार, एक्सचेंज बिल्डिंगच्या दुसर्‍या मजल्यावर आग लागली आहे. येथे Narcotics Control Bureau म्हणजेच एनसीबीचं कार्यालय आहे. सध्या एनसीबीकडून सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी ड्रग्ज च्या तस्करी अनुषंगाने अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि अन्य लोकांचा तपास सुरू आहे.

अद्याप दक्षिण मुंबई मध्ये Ballard Estate भागात Exchange Building मध्ये लागलेल्या आगीमध्ये अद्याप कोणत्याही जिवितहानीची माहिती समोर आलेली नाही.

ANI Tweet

मागील आठवड्यात मुंबई मध्ये वरळी भागात पासपोर्ट कार्यालयाच्या इमारतीमध्ये एका केमिकल लॅब मध्ये सिलेंडरचा स्फोट झाला होता. या स्फोटामध्ये एक महिला जखमी झाल्याचं वृत्त होतं. सुदैवाने वरळी मधील आग नियंत्रणात आणण्याला अग्निशमन दलाला यश आलं होतं. त्यामध्ये कोणतीही जीवीतहानी झालेली नव्हती.

(The above story first appeared on LatestLY on Sep 21, 2020 01:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).