Mumbai Fire: वांद्रे येथील 'सी स्प्रिंग' इमारतीतील फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत 20 वर्षीय तरूणीचा मृत्यू, एक महिला गंभीर जखमी

मुंबई मध्ये आज सकाळी (19 मार्च) रहिवासी इमारतीच्या फ्लॅटमध्ये आग लागून एका युवतीचा मृत्यू झाला असुन अन्य एक महिला गंभीर स्वरूपात भाजली आहे.

Representational Image (Photo Credits: Twitter)

मुंबई मध्ये आज सकाळी (19 मार्च) रहिवासी इमारतीच्या फ्लॅटमध्ये आग लागून एका युवतीचा मृत्यू झाला असुन अन्य एक महिला गंभीर स्वरूपात भाजली असल्याचे वृत्त PTI या वृत्त संस्थेने दिली आहे. दरम्यान मृत युवती ही 20 वर्षीय असून गंभीर स्वरूपात भाजलेल्या महिलेवर नजिकच्या भाभा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. महापालिकेच्या एक अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार वांद्रे येथील सी स्प्रिंग इमारतीच्या सहाव्या मजल्यावर ही आग लागली होती. सकाळी 7च्या सुमारास लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून या इमरतीसमोर बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान याचा 'मन्नत' बंगला आहे.

दरम्यान मागील काही दिवसांपासून मुंबई शहरात आग लागण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. काल (18 मार्च) दिवशी दुपारी नवी मुंबई येथील प्रसिद्ध डी. वाय पाटील स्टेडियम जवळ देखील गर्ल्स हॉस्टेलला आग लागली होती. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र आगीचे लोळ, धूर पाहून नागरिकांमध्ये, सोशल मीडियात भीतीचे वातावरण पसरले होते.

ANI Tweet

पुणे शहर देखील आज सकाळी जुनी वडारवाडी भागात रात्री 2 च्या सुमारास लागलेल्या आगीचे वृत्ताने जागे झाले. या भीषण आगीमध्ये सुमारे 15-20 झोपडपट्ट्या जळाल्या असून कोणतीही जीवितहानीची बाब समओर आलेली नाही. दरम्यान ही आग गॅस सिलेंडरचा ब्लास्ट झाल्याने भडकली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement