मुंबई: 'Free Kashmir' चे पोस्टर झळकवणाऱ्या तरुणीच्या विरोधात FIR दाखल
याच पार्श्वभुमीवर मुंबईत
मुंबई येथे जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. याच पार्श्वभुमीवर मुंबईत सुद्धा संतापाची लाट दिसून आल्याने गेटवे ऑफ इंडिया यथे विद्यार्थ्यांनी त्याच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. याच आंदोलनादरम्यान एका तरुणीने फ्री कश्मीर नावाचा पोस्टर झळकवले होते. यावरुन आता वाद निर्माण झाला असून तिच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहे. फ्री कश्मीर या पोस्टरचा मुख्य उद्देश फक्त जम्मू-कश्मीर येथे सुरु असलेल्या बंदीकडे लक्ष वेधणे होते. सोमवारी एका न्यूज वाहिनेने जाहीर केलेल्या एका व्हिडिओत एका तरुणीच्या हातात फ्री कश्मीर नावाचे पोस्टर झळकल्याचे दिसून आले होते. मात्र या पोस्टर मागे तरुणीची कोणतीच विचारसरणी नसल्याचे सांगण्यात येत आहे.
महक मिर्जा असे तरुणीचे नाव असून ती मुंबईतील रहिवाशी आहे. पेशाने ती स्टोरीटेलर असुन तिने फेसबुकच्या माध्यमातून एक व्हिडिओ पोस्ट करत संपूर्ण घटेनेची अधिक माहिती दिली होती. महक हिने असे लिहिले की, मी काल संध्याकाळी सात वाजल्याच्या सुमारास गेटवे ऑफ इंडियाच्या येथे गेली असता तेथे जोरदार आंदोलन सुरु होते. या आंदोलनात मी सुद्धा सहभागी झाले. आंदोलनात सामील झालेले सर्व विद्यार्थी जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या विरोधात न्याय देण्यात यावा अशी मागणी करत होते. त्याचवेळी मी काही लोकांना जेएनयूच्या समर्थनार्थ एनआरसी, सीएए सारख्या मुद्द्यांवरुन पोस्टर बनवताना पाहिले गेले. माझ्या बाजूला फ्री कश्मीर लिहिले असलेले पोस्टर ठेवण्यात आले होते. त्यावेळी माझ्यामध्ये कश्मीरी लोकांच्या मूळ हक्कांबाबतचा विचार आला. मात्र आता महक तिच्या सुरक्षिततेवरुन घाबरली आहे.(JNU Protest : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल; किरीट सोमय्या यांनी पोलिसांत केली तक्रार)
ANI Tweet:
जेएनयू विद्यार्थी संघटनेने या हल्ल्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) कार्यकर्त्यांवर आरोप लगावला आहे. या एकूण प्रकरणाचे पडसाद मुंबई, पुणे सहित महाराष्ट्रात प्रमुख शहरांमध्ये दिसून आले. तर मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे सोमवारी मध्यरात्री विद्यार्थ्यांनी शांतात आंदोलन स्वरूपात कँडल मार्च काढत या हल्ल्याचा निषेध केला. तर पुण्यात एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी अभाविपच्या विरुद्ध निषेधाच्या घोषणा देत आंदोलन केले.