Mumbai: रस्त्यावर दारु पिऊन धिंगाणा करणाऱ्या कपलला अटक

रस्त्यावर दारु पिऊन धिंगाणा करणे एका कपलला चांगलेच महागात पडले आहे. खरंतर ही घटना शुक्रवारची असून कपलच्या विरोधात विमानतळ पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्यांना जामीनावर सोडून दिले.

Mumbai: रस्त्यावर दारु पिऊन धिंगाणा करणाऱ्या कपलला अटक
Representational Image (Photo Credits: ANI)

रस्त्यावर दारु पिऊन धिंगाणा करणे एका कपलला चांगलेच महागात पडले आहे. खरंतर ही घटना शुक्रवारची असून कपलच्या विरोधात विमानतळ पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्यांना जामीनावर सोडून दिले. सदर कपल हे एका पंचतारांकित हॉटेलच्या बाहेर दारु पिऊन रस्त्यावरच एकमेकांसोबत भांडण करत होते.(16 वर्षीय मुलीने दहावीच्या बोर्ड परीक्षेचं दडपण घेत अपहरण झाल्याचं कुटुंब, पोलिसांना सांगितलं खोटं; पोलिस चौकशीमध्ये झालं उघड)

कपल हे दारु पिऊन एकमेकांना झॉंम्बी म्हणून संबोधत होते. तसेच एकमेकांना मारत सुद्धा होते. त्याचवेळी पोलीस कॉन्स्टेबल यांनी त्यांच्याकडे पाहिले आणि त्यांना ताब्यात घेत पोलीस स्थानकात नेले. दरम्यान, नवऱ्याने बायकोला रेस्टॉरंट-बार मध्ये घेऊन जाण्यास नकार दिल्याने त्यांच्यामध्ये भांडण सुरु झाले होते. पोलिसांनी त्यांच्या विरोधात कारवाई केली आहे. या कपलचे नुकतेच 22 फेब्रुवारीला लग्न झाले होते. तसेच कॉन्स्टेबल सोबत सुद्धा त्यांचा वाद झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.(Suicide: येरवडा तुरुंगातील रक्षकाचा कारागृहाच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर)

नुकत्याच  मुंबईत प्रियकर  आणि त्याच्या साथीदाराच्या मदतीने तिच्या पतीला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. दोघांनीही त्या पुरुषावर हल्ला (Attack) करून गंभीर जखमी केले. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) मध्ये कार्यरत सॉफ्टवेअर अभियंता असलेल्या पीडितवर 19 फेब्रुवारी रोजी अंधेरी रेल्वे स्थानकाबाहेरील (Andheri railway station) मुख्य रस्त्यावर दोन व्यक्तींनी हल्ला केला. तेव्हा त्याच्यावर खोल जखमा झाल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरेन शहा हे त्यांची पत्नी जिनल हिला सकाळी 6.30 वाजता रेल्वे स्टेशनवर सोडल्यानंतर त्यांच्या पार्क केलेल्या कारमध्ये परतत असताना ही घटना घडली होती.

(The above story first appeared on LatestLY on Feb 28, 2022 02:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).