Mumbai District Bank Presidential Election Election 2022 Results: मुंबै बँक निवडणुकीत भाजप पराभूत, प्रविण दरेकर यांना धक्का; प्रसाद लाड यांचा पराभव, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस विजयी

या निवडणुकीत भाजपचा जोरदार परभव झाला आहे. या पराभवामुळे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांना जोरदार धक्का बसला आहे.

Mumbai Bank | ( Archived, edited, symbolic images )

मुंबै बँक अध्यक्षपद निवडणुकीत (Mumbai District Bank Presidential Election Election 2022 Results) भारतीय जनता पक्षाला (BJP ) जोरदार धक्का बसला आहे. या निवडणुकीत भाजपचा जोरदार परभव झाला आहे. या पराभवामुळे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांना जोरदार धक्का बसला आहे. तर प्रसाद लाड (Prasad Lad) यांचाही पराभव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे उमेदवार सिद्धार्थ कांबळे यांनी लाड यांचा दोन मतांनी पराभव केला. त्यामुळे सिद्धार्थ कांबळे यांचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. तर उपाध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे (Shiv Sena) अभिषेक घोसाळकर भाजपकडून विठ्ठल भोसले यांच्यात सामना झाला. उपाध्यक्ष पदासाठी दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाली आहेत. त्यामुळे उपाध्यक्ष पदासाठी निवड कशी होते याबाबत उत्सुकता आहे.

पाठीमागील काही वर्षांपासून मुंबै बँकेवर प्रविण दरेकर यांची सत्ता आहे. बँकेच्या अध्यक्षपदीही प्रविण दरेकर प्रदीर्घ काळ राहिले होते. पाठीमागील सलग सात वर्षे ते बँकेचे अध्यक्ष होते. मात्र, महाविकासआघाडीने राजकीय चक्रे वेगाने फिरवत भाजपला धक्का दिला आहे. प्रविण दरेकर यांच्या हातून मुंबै बँकेची किल्ली हिसकावली आहे. मतांची एकूण संख्या पाहता भाजपकडे 9 तर शिवसेना-राष्ट्रवादीकडे 11 सदस्य आहेत. (हेही वाचा, Ashish Shelar Demand: महसूल विभागाने मुंबई उपनगरातील गृहनिर्माण सोसायट्यांना जारी केलेल्या अकृषिक कर नोटिसांना स्थगिती देण्याची आशिष शेलारांची मागणी)

दरम्यान, मुंबै बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी महाविकासआघाडीमधील नेत्यांची एक बैठक मुंबई येथे सह्याद्री अतिथिगृहात पार पडली. या बैठकीपूर्वीच मुंबै बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. जी प्रत्यक्षातही पाहायला मिळाली.