मुंबई: धारावीत आज कोरोना व्हायरसचे आणखी 8 रुग्ण आढळून आल्याने आकडा 2218 वर पोहचला, महापालिकेची माहिती
त्यामुळे आकडा 2218 वर पोहचल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. धारावी सुद्धा कोरोनाचा सुरुवातीला हॉटस्पॉट ठरला होता.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. तर राज्यातील मुंबई, ठाणे आणि पुणे हे कोरोनाचे प्रामुख्याने हॉटस्पॉट ठरले आहेत. या ठिकाणी कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे. याच दरम्यान आता मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत (Dharavi) आज कोरोनाचे नवे 8 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आकडा 2218 वर पोहचल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. धारावी सुद्धा कोरोनाचा सुरुवातीला हॉटस्पॉट ठरला होता. मात्र धारावीतील कोरोनाची परिस्थिती हळूहळू सुधारत असल्याचे दिसून येत आहे.(महाराष्ट्र: भिवंडी मधील एका मस्जिदीचे COVID19 च्या केंद्रात रुपांतर, रुग्णांना निशुल्क ऑक्सिजनची उपलब्धता)
धारावी या ठिकाणी दाटीवाटीने लोकवस्ती आहे. त्यामुळे सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पाळणे थोडे कठीण आहे. परंतु तरीही महापालिकेकडून धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक पसरु नये म्हणून वेळोवेळी खबरदारी घेण्यात येत आहे. तर धारावीत कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा सुद्धा घटला आहे.(औरंगाबाद येथे COVID19 चे थैमान, आज नव्याने 193 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आकडा 4 हजारांच्या पार)
दरम्यान, मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 70878 वर पोहचला असून 4062 जणांचा बळी गेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार नियमात शिथिलता आणत काही गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र त्यावेळी अटी आणि नियमांसह सोशल डिस्टंन्सिंग पाळणे अनिवार्य असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे.