मुंबई: कांंदिवली येथील शताब्दी रूग्णालयातून 80 वर्षीय कोरोनाबाधित रूग्णाचा मृतदेह बोरिवली स्थानकाजवळ सापडल्याने खळबळ; विरोधकांकडून पालिका प्रशासनाच्या कामकाजावर टीका
कांदिवली (Kandivali) येथील मुंबई महानगर पालिकेच्या शताब्दी रूग्णालयातून ( Shatabdi Hospital) 80 वर्षीय कोरोनाबाधित रूग्ण गायब झाला होता आणि त्यांचा मृतदेह बोरिवली स्थानकाजवळ आढळला आहे.
मुंबईमध्ये काल (8 जून) कोरोनाबाधितांचा आकडा 50 हजारांच्या पार गेल्यानंतर आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान मीडिया रिपोर्ट्सनुसार, कांदिवली (Kandivali) येथील मुंबई महानगर पालिकेच्या शताब्दी रूग्णालयातून ( Shatabdi Hospital) 80 वर्षीय कोरोनाबाधित रूग्ण गायब झाला होता आणि त्यांचा मृतदेह बोरिवली स्थानकाजवळ आढळला आहे. दरम्यान या घटनेचा तपास सुरू असून संबंधितांवर कारवाई बाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. Coronavirus: कोरोना रुग्ण शोधण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण; महाराष्ट्रासह दहा राज्यांसाठी केंद्र सरकारचा निर्णय.
दिवसागणिक मुंबई शहरामध्ये कोरोनाचं संकट गहिरं होत आहे. मागील अनेक दिवसांपासून रूग्णांना तात्काळ बेड उपलब्ध होत नसल्याची तसेच सायन, राजावाडी सारख्या रूग्णालयांमध्ये संबंधित कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करताना त्यांच्या बाजूलच मृतदेह ठेवल्यसारख्या घटना समोर आल्या आहेत. अशामध्ये आता पालिका रूग्णालयातील हा एक नवा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या धक्कादायक वृत्ताचा विरोधकांनी समाचार घेत पालिका प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
राम कदम यांचं ट्वीट
किरीट सोमय्या यांचं ट्वीट
दरम्यान मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले यांनी मीडियाला माहिती देताना आम्ही लवकरच या घटनेचा आढावा घेऊन संबंधित अधिकारी दोषी आढळला तर त्यावर कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे. आज अमेय घोले यांच्यासोबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर देखील कांदिवलीच्या शताब्दी रूग्णालयामध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.