Dance bar Economy: मुंबई डान्स बार -छम छम किती पैसा मिळवून देते? राबणारे उपाशी, मालक तुपाशी
सांगितले जाते की, मुंबईतील एका बड्या राजकीय नेत्याचीच पाच डान्सबारमध्ये भागिदारी आहे. एकेकाळी अनेक राजकीय पक्षांच्या उत्पादनाचा स्त्रोतच मुळी डान्सबार असल्याचे विदारक सत्य या क्षेत्रातील जाणकार मंडळी सांगतात.
Mumbai dance bar Economy: डान्स बार, नाव जरी उच्चारले तरी डोळ्यासमोर झळकते ती छम छम. ही छम छम (Cham Cham) मग पैशांची असो की घुंगराची. या छमछमपाईच महाराष्ट्रातील मोठी युवाशक्ती कारणाशिवाय वाया गेली. असंख्य कुटुंबं देशोधडीला लागली. कुणाचा मुलगा गेला, कुणाचा भाऊ, कुणाचा बाप तर कुणाचा नवरा. कधी स्वखुशीनं कधी जबरस्तीनं तर कधी फसवून गळाला लागलेल्या (की लावलेल्या) असंख्य तरुणींच्या शरीराचा, भविष्याचा आणि आयुष्याचा सत्यानाश केला या डान्स बारनं. अखेर ग्रामीण भागातील जनतेच्या भावना ओळखून सरकारनं डान्स बार बंद केले. पण, न्यायालयाच्या आदेशाने हे डान्सबार पुन्हा सुरु होणार आहेत. तुम्हाला माहिती आहे या धंद्यातून मिळणारे उत्पन्न (Dance Bar Earning). डान्स बारमध्ये राबणाऱ्याला फारसं काही मिळत नसलं तरी, डान्स बार चालवणाऱ्यांची मात्र चांदीच असते. पैसाच पैसा. जाणून घ्या डान्स बारमधून चालक-मालकांना होणारी कमाई.
'गंदा है पर धंदा है' हा बॉलिवूड चित्रपटातील डायलॉग ज्या कोणत्या धंद्याल फिट बसतो त्यापैकी एक धंदा म्हणजे डान्सबार. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहराच्या अर्थव्यवस्थेत साधारण दीड दशकांपूर्वी (पंधरा वर्षांपूर्वी) डान्सबारचा मोठा वाटा होता.लाखो लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकणारा डान्स बार. हा काही छोटा-मोठा व्यवसायच नव्हता. तर,एकाच वेळी तब्बल दोन लाख कोटी रुपये (20,00,00,00,00,000) रुपयांची वैध-अवैध मार्गाने उलाढाल करणारी अर्थव्यवस्थाच (Dance Bars Economy) होती ती. या व्यवसायाचा अभ्यास करणारे अभ्यासक सांगतात, '2005 मध्ये डान्स बार बंद झाले तेव्हा, या धंद्यातील वैध (अधिकृत) उलाढालच सुमारे 40 ते 42 हजार कोटी होती. ही आकडेवारी पाहता गेल्या 10 ते 15 वर्षात सुमारे एक लाख कोटी रुपयांचे सरकारी उत्पन्न घटले आहे'.
विवेक अग्रवाल यांनी मुंबई डान्सबार संस्कृती या विषयावर सखोल अभ्यास करुन एक पुस्तक लिहिले आहे. 'बॉम्बे बार' नावाच्या या पुस्तकात या विषयी महत्त्वापूर्ण माहिती आहे. पुस्तकाच्या लेखकाने एका वृत्तपत्राशी बोलताना दावा केला आहे की, या व्यवसायात विविध गोष्टींवर खर्च होतो. यात दारू, डान्सर, वेश्यावृत्ती ते पोलिसांना दिला जाणारा हप्ता इथपर्यंतच्या गोष्टींचा समावेश आहे. अशीही चर्चा आहे की, मुंबई पोलिसांना डान्सबार मालकांकडून दिल्या जाणाऱ्या हाप्त्याची रक्कमच 15 ते 20 हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. (हेही वाचा, मुंबईत पुन्हा एकदा छमछम वाजणार, डान्सबारवरील जाचक अटी सुप्रीम कोर्टाकडून रद्द)
डान्स बार प्रमुख घडामोडी (* आकडेवारी प्रसारमांध्यमांतील वृत्तावरुन)
- 2005मध्ये डान्स बारवर पहिल्यांदा बंदी घालण्यात आली
- बंदी घालण्यात आली तेव्हा मुंबईत 20 ते 22 हजार वैध-अवेध डान्स बार होते.
- सरकारी आकड्यांनुसार 800 डान्सबार नोंदणीकृत होते. (हा आकडा आता वाढला असू शकतो.)
- 02 ते अडीच हजार डान्सबार बंदी असूनही सुरुच असल्याची चर्चा.
- एकट्या मुंबईतच डान्सबारमध्ये काम करणाऱ्या डान्सर (बारबाला) संख्या सुमारे 75 हजार.
- अद्यापही वेटर किंवा गायिका म्हमून सुमारे 35 हजार महिला काम करतात.
- डन्स बार बंद झाल्यानंतर 40 हजार महिलांनी इतर व्यवसाय सुरु केला.
डान्स बार व्यवसायात अनेक उद्योगपती, राजकीय नेते आणि पोलिसही सहभागी असतात. सांगितले जाते की, मुंबईतील एका बड्या राजकीय नेत्याचीच पाच डान्सबारमध्ये भागिदारी आहे. एकेकाळी अनेक राजकीय पक्षांच्या उत्पादनाचा स्त्रोतच मुळी डान्सबार असल्याचे विदारक सत्य या क्षेत्रातील जाणकार मंडळी सांगतात.