मुंबई मधील दही हंडी उत्सावत 51 गोविंदा जखमी, रुग्णालयात उपचार सुरु

तर दही हंडीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी विविध गोविंदा पथक या ठिकाणी उपस्थित राहून मानवी मनोरा रचत हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात.

दही हंडी (फोटो सौजन्य-फेसबुक)

गोकुळाष्टमीच्या निमित्ताने मुंबईत (Mumbai) दही हंडीचे (Dahi Handi) आयोजन करण्यात आले आहे. तर दही हंडीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी विविध गोविंदा पथक या ठिकाणी उपस्थित राहून मानवी मनोरा रचत हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. परंतु दही हंडीचा आनंद साजरा करताना प्रत्येक गोविंदाने आपली स्वत:ची काळजी घेणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. मात्र आज विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या दही हंडीत आता पर्यंत एकूण 51 गोविंदा जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या गोविंदावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

जखमी झालेल्या गोविंदांपैकी 27 जणांना आता पर्यंत उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे. तसेच 24 गोविंदावर मुंबईमधील विविध रुग्णालयात अद्याप उपचार सुरु आहेत. मुंबईमधील नायर, केईएम, जसलोक अशा विविध महापालिकांच्या रुग्णालयात जखमी गोविंदावर उपचार सुरु आहेत.(Thane Dahi Handi 2019: जय जवान पथकाची 9 थरांची सलामी; यंदा 10 मानवी थर रचून विश्वविक्रमाचा मानस)

मात्र गेल्या वर्षी दही हंडी फोडण्यासाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत. तसेच हंडीच्या सर्वात वरच्या थराला लहान मुलांना चढवून नये. त्याचसोबत लाइव्ह जॅकेटचा वापर करण्यासंबंधित काही नियम गोविंदापथकांना पाळण्याचे आदेश दिले होते. परंतु दही हंडीचा उत्सव साजरा करताना प्रत्येक वर्षी गोविंदा जखमी होतातच. त्यामुळे दही हंडी खेळताना प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यावी असे आवाहन केले जाते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif