प्रिन्स चार्ल्स आजोबा झाल्याच्या आनंदात मुंबई डब्बेवालेही सहभागी; Archie Harrison Mountbatten-Windsor साठी पाठवल्या शुभेच्छा!

मुंबई डबेवाल्यांचा मित्र प्रिन्स चार्ल्स आजोबा झाले व ब्रिटनच्या राजघराण्याला नविन राजपुत्र मिळाल्याच्या आनंदात मुंबई डब्बेवालेदेखील सहभागी, पाठवल्या शुभेच्छा

Prince Harry and his wife Meghan Markle's royal baby (Photo Credits: IANS)

प्रिन्स हॅरी (Prince Harry) आणि मेघन मार्कल (Meghan Markle) या शाही दामपत्याला दोन दिवसांपुर्वी (6मे) पुत्ररत्न झाले. लंडनच्या राजघराण्यातील या चिमुकल्याच्या आगमनाने बर्हिमहॅग पॅलेस सह सर्व इंग्लंड मध्ये साजरा करण्यात आला आहे. मेघन आणि हॅरीच्या मुलाचं नाव  Archie Harrison Mountbatten-Windsor ठेवण्यात आलं आहे. या आनंदामध्ये मुंबईचे डबेवालेही सहभागी झाले आहेत. मुंबई डबेवाल्यांचा मित्र प्रिन्स चार्ल्स आजोबा झाले व ब्रिटनच्या राजघराण्याला नविन राजपुत्र मिळाला आहे.

डबेवाल्यांना फारसे कोणी ओळखत नव्हते पण प्रिन्स चार्ल्स डबेवाल्यांना भेटायला मुंबईला आले व ते डबेवाल्यांच्या कामाचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले. कौतुक करून ते थांबले नाही तर आपल्या

दुसर्‍या लग्नाचे निमंत्रण त्यांनी डबेवाल्यांना दिले. डबेवाले ही निमंत्रण मिळाल्या वर प्रिन्स चार्ल्स च्या लग्नाला लंडन येथे गेले.

मेघन आणि हॅरीच्या मुलाची पहिली झलक

प्रिन्स चार्ल्स आम्हाला येऊन भेटले आमचे सोने नाही झाले पण जगात सोन्या सारखी चमक त्यांनी आम्हाला मिळवुन दिली.आम्हाला प्रसिध्दी मिळवून देणारा प्रिन्स चार्ल्स आजोबा झाले व राजघराण्याला राजपुत्र मिळाला बाळ आणि बाळंतीण सखरूप आहे. याचा आम्हाला आनंद झाला आहे. या नुतन बालकास दिर्घायुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.

प्रिन्स हॅरी आणी मेघन यांच्या लग्न सोहळ्यात डबेवाल्यांनी आवर्जुन मराठमोळा आहेर त्यांना पाठवला होता. हॅरी साठी सलवार-कुर्ता फेटा तर मेघनसाठी पैठणीसाडी-चोळी पाठवली होती.