Mumbai Crime: सांताक्रूझमध्ये महागडे शूज चोरणाऱ्याला चोराला अटक; बाजारात विकाण्यापुर्वीच पोलिसांनी केले जप्त

सलीम हा कुर्ला आणि वाकोला येथील बाजारात चोरलेल्या शूजची विक्री करायचा, तो साधारणपणे 3,000 ते 4,000 रुपये किमतीचे शूज केवळ 200-300 रुपयांना विकायचा.

Shoes | प्रातिनिधिक प्रतिमा | Photo Credit : Pixabay

सांताक्रूझ (Santacruz) येथील निवासी सोसायटीतून महागडे बूट (Expensive Shoes) चोरणाऱ्या आरोपीला वाकोला पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. चोरलेले बूट बाजारात विकण्याआधीच जप्त करण्यात पोलिसांना यश आले. सलीम शेख असे आरोपीचे नाव असून तो कुर्ला येथील रहिवासी आहे. त्याच्याकडे चोरीचा इतिहास असून, त्याला कुर्ला पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अटक केली होती. सध्या बेरोजगार असलेल्या शेखने सांताक्रूझ येथील अनिकेत टॉवरमधून शूज चोरल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख रात्री 9.30 च्या सुमारास सोसायटीत शिरला, वरच्या मजल्यावर गेला आणि नंतर चौथ्या मजल्यावर गेला, तिथे त्याने एक जोडे चोरले.

चोरीच्या शूजचे मालक, इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय करणारे कमलेश कुमावत यांनी सांगितले की, त्यांचे 4,200 रुपये किमतीचे नवीन खरेदी केलेले शूज सोमवारी सकाळी गायब झाले. त्यांच्या फ्लॅटच्या बाहेर लावलेल्या कॅमेऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर कुमावत यांच्या लक्षात आले की, एक अज्ञात व्यक्ती त्यांचे बूट चोरत आहे. त्यांनी तत्काळ वाकोला पोलिसांना माहिती दिली.

त्यांनतर अधिकाऱ्यांनी शेखचा कुर्ल्यातील घरातून शोध घेतला. सलीम हा कुर्ला आणि वाकोला येथील बाजारात चोरलेल्या शूजची विक्री करायचा, तो साधारणपणे 3,000 ते 4,000 रुपये किमतीचे शूज केवळ 200-300 रुपयांना विकायचा. वरिष्ठ निरीक्षक प्रकाश खांडेकर यांनी याबाबत माहिती दिली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, शेख हा सांताक्रूझ, कुर्ला, खार, विलेपार्ले, अंधेरी आदी भागातील अनेक सोसायट्यांमधून चपला चोरत असल्याचे तपासात समोर आले आहे. आतापर्यंत केवळ एक जोडी जप्त करण्यात आली आहे. (हेही वाचा: Online Crimes in Maharashtra: सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल; नव्या सेंटरची स्थापना, त्वरित कारवाईसाठी जारी केला हेल्पलाईन क्रमांक)

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हा चोरीचे बूट खरेदी करणाऱ्या इतर लोकांसोबत काम करतो. 2,000 ते 5,000 रुपये किंवा त्याहून अधिक किमतीचे बूट मध्यस्थांना विकले जातात, ज्यामध्ये शेखला 10 ते 20 टक्के वाटा मिळतो. हे शूज चोरबाजारात नेले जातात, तिथे ते अर्ध्या किमतीत विकले जातात. एका पोलिस सूत्राने सांगितले की, आदिदास, नायके, रेड कार्पेट लेदर आणि स्केचर्स सारख्या ब्रँडचे स्नीकर्स, लेदर आणि स्पोर्ट्स शूजना बाजारात मोठी मागणी आहे.