Mumbai Crime: तीन वर्षांच्या बालकाचे अपहरण, 50 हजार रुपयांची खंडणीही मागितली; मुंबई पोलिसांकडून आरोपी 17 तासात गजाआड

साडेतीन वर्षांच्या लहान मुलाचे अपहरण (Kidnapping) करुन त्याच्या पालकांकडून 50 हजार रुपयांची खंडणी (Ransom ) मागितल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) मालाड (Malad) शाखेने या गुन्ह्यात तातडीने तपास करुन अवघ्या 17 तासांच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Mumbai Crime: तीन वर्षांच्या बालकाचे अपहरण, 50 हजार रुपयांची खंडणीही मागितली; मुंबई पोलिसांकडून आरोपी 17 तासात गजाआड
Kidnapping | (File Image)

साडेतीन वर्षांच्या लहान मुलाचे अपहरण (Kidnapping) करुन त्याच्या पालकांकडून 50 हजार रुपयांची खंडणी (Ransom ) मागितल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) मालाड (Malad) शाखेने या गुन्ह्यात तातडीने तपास करुन अवघ्या 17 तासांच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी हा सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. लग्नासाठी पैसे जमविण्याच्या हेतुने त्याने मुलाचे अपहरण केल्याची प्राथमिक माहिती आहे. मुकेश जयपाल सिंह (27) असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला सध्या तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तो मालाड पश्चीम येथील नाडियादवाला कॉलनी क्रमांक 1 येथे पाठीमागील चार वर्षांपासून सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. पीडित मुलगा आणि त्याचे आईवडीलही त्याच परिसरात राहात होतो. पीडित मुलाचे आईवडील हे मजूर आहेत. आरोपी आणि पीडित मुलाचे कुटुंबीय एकमेकांना चांगले ओळखत होते. या ओळखीतून तो अनेकदा या लहान मुलाला चॉकलेटही देत असे.

मुलाच्या अपहरणाची घटना घडली त्या दिवशी आरोपीरात्री आठ वाजणेच्या सुमारास मुलाला चॉकलेट देण्यासाठी घेऊन गेला. मात्र, त्यानंतर हा मुलगा परत आलाच नाही. त्यानंतर आरोपीने मुराज्या सुपरवायझरला मुलाच्या सुटकेसाठी 50,000 रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर मुलाच्या पालकांनी पोलिसात धाव घेऊन मदत मागितली. (हेही वाचा, Thane: भीक मागण्यासाठी 3 वर्षांच्या मुलाचे अपहरण: पोलिसांनी 12 तासांत केली सुटका)

पालकांची तक्रार प्राप्त होताच डीसीपी विशाल ठाकूर आणि एसीपी रेणुका बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली काही पथके पोलिसांनी तैनात केली. त्यानंतर आरोपी सिंह याच्या मोबाईल क्रमांकावर पोलिसांनी संपर्क केला. मात्र, त्याचा मोबाईल बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही. परिणामी पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी आरोपीला सतत भेटणाऱ्या त्याच्या मित्राचाही फोन ट्रॅक केला. मात्र त्याचाही फोन बंदच आढळला.

शेवटी आरोपीचा माग काढत पोलिसांनी त्याला दहिसर पश्चिमेस असलेल्या कांदरपाडा परिसरातून ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून मुलाचीही सुखरुप सुटका करण्यात आली. पोलिसांनी सिंग यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चौकशीत त्याने लग्नासाठी पैशांची गरज होती, त्यामुळे हा गुन्हा केल्याचे सांगितले.

(The above story first appeared on LatestLY on May 20, 2022 07:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).