Mumbai Crime: मुंबई कांदिवलीत दगडाने ठेचून एकाची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक

याप्रकरणी समता नगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली होती.

Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई शहरात गुन्हेगारीचे (Mumbai City Crime) प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील कांदिवली (Kandivali) पूर्व येथे सापडलेल्या मृतदेहाच्या हत्येचा उलगडा करण्यात समता नगर पोलिसांना यश आले असून याप्रकरणी 34 वर्षीय आरोपीला पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. प्रेमसंबंधाला अडसर ठरत असल्यामुळे आरोपीने मृत व्यक्तीला दारू पाजून दगडाने ठेचून त्याची हत्या केल्याचे उघड झाले आहे. (हेही वाचा -Ahamdanagar Accident: नगरमध्ये आळंदीकडे जाणाऱ्या पालखीत शिरला कंटेनर, 2 भाविकांचा मृत्यू)

कांदिवली पूर्व या ठिकाणी काही दिवसांपासून एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली होती. पण मृत व्यक्ती पडून त्याच्या डोक्याला मार लागेल अशी कोणतीही वस्तू घटनास्थळी उपस्थित नव्हती. पोलिसांनी स्थानिक खबऱ्यांच्या मार्फत माहिती घेतली असता मृत व्यक्ती आरोपी रविंद्र गिरी  याच्यासोबत दारू प्यायला होता, अशी माहिती मिळाली. यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानेच हत्या केल्याचे निष्पन्न झाले.

आरोपीचे मृत व्यक्तीच्या पत्नीवर प्रेम होते. त्यातून गिरीने त्याला मारण्याचा कट रचला. सुरुवातीला त्याला दारू पाजून त्याची शुद्ध हरपल्यानंतर तेथील खदान परिसरात नेऊन त्याच्या डोक्यात दगड मारला.  याप्रकरणी समता नगर पोलिसांनी गिरीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.