Mumbai Crime: महिलेनेचं महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी न्यायलयाकडून आरोपी महिलेस कारावासाची शिक्षा

माझगाव कोर्टानं एका महिलेला वर्षभराच्या कारावासाची शिक्षा आणि 6 हजारांचा दंडही ठोठावला आहे.

Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Newsplate)

हल्ली कुठल्या प्रकारचा गुन्हा ऐकु येईल याचा काही नेम उरलेला नाही. महिला कुठेही सुरक्षित नाहीत असं तुम्ही १०० वेळेस ऐकलं असाल. पण महिला कुणाबरोबरही सुरक्षित नाही हे आज पुन्हा एकदा सिध्द झालं आहे. महिलेवर अत्याचार करणारे अनेक पुरुषी हिंसक वृत्ती कायम आपल्या कानावर पडते. कधी अनोळखी, निच मनोवृत्तीचे पुरुष महिलांवर अत्याचार करताना दिसतात. तर काही जवळचे, ओळख असलेले पुरुषचं महिलेचा विश्वासघात करताना दिसता. म्हणजेच महिला ओळखी किंवा अनोळखी कुठल्याही पुरुषाच्या सहवासात सुरक्षित नाहीचं. पण आता महिला खुद्द महिले बरोबरचं सुरक्षित नाही अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मुंबईतून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विनयभंगाच्या आरोपातंर्गत (Molestation Case) मुंबईतील कोर्टानं एक महिलेला दोषी ठरवलं आहे. माझगाव कोर्टानं एका महिलेला वर्षभराच्या कारावासाची शिक्षा आणि 6 हजारांचा दंडही ठोठावला आहे.

 

शेजारी महिलांमध्ये भांडण (Argument) शिगेला पेटलं. दोन्ही महिला ऐकमेकींच्या अंगावर धावून आल्या. तोच आरोपी महिलेने पडित महिलेचा गळा आवरुन महिलेस जबर मारहाण केली. तसेच पिडीतेचे कपडे फाडत तिला अंतरअंगास स्पर्श केला. एवढचं नाही तर आरोपी महिलेने स्वतच्या पतिला माझ्यावर बलात्कार करा असं ही सांगितल, या पध्दतीची पोलिस तक्रार (Police Complain) पिडितेने केली. हा खटला माझगाव कोर्टात चालला. तरी प्रकरणाचा न्यायनिवाडा करत न्यायालयाने दोषी महिलेस शिक्षा सुनावली. (हे ही वाचा:- Belapur Crime: अमानुषतेचा कळस! मित्राच्या गुप्तांगात लाटणं घालत काढला व्हिडीओ)

 

माझगाव न्यायालयाने (Mazgaon Magistrate Court) दिलेला हा निर्णय विचित्र वाटत असला तरी हा वैध निर्णय आहे. कारण पुरुषांप्रमाणेच महिलेकडूनही दुसऱ्या महिलेवर विनयभंग होऊ शकतो. तो करण्याच्याच हेतूनं बळाचा वापर करून किंवा तिला मारहाण झाली असेल तर आरोपी महिलेलाही विनयभंगाच्या आरोपांतर्गत दोषी ठरवता येऊ शकतं. एखाद्या स्त्रीला या आरोपांतून वगळण्यात यावं, असं कायद्यात कुठेही नमूद करण्यात आलेलं नाही, असं माजगाव न्यायालयाने नमूद केलं आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif