Mumbai Crime: अमेरिकन महिलेसमोर कॅब चालकाचे हस्तमैथुन, डीएन नगर पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल, आरोपीस अटक
मुंबई पोलिसांनी एका 40 वर्षीय कॅब चालकाला (Cab Driver) अटक केली आहे. चालकाने कारमध्ये बसलेल्या अमेरिकन महिला प्रवाशासमोर हस्तमैथुन (Masturbation) करुन त्याचा विनयभंग केला असा त्याच्यावर आरोप आहे. संबंधीत कॅब चालकाविरोधात डीएन नगर पोलीस (DN Nagar Police) स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्याला अटकही करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांनी एका 40 वर्षीय कॅब चालकाला (Cab Driver) अटक केली आहे. चालकाने कारमध्ये बसलेल्या अमेरिकन महिला प्रवाशासमोर हस्तमैथुन (Masturbation) करुन त्याचा विनयभंग केला असा त्याच्यावर आरोप आहे. संबंधीत कॅब चालकाविरोधात डीएन नगर पोलीस (DN Nagar Police) स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्याला अटकही करण्यात आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटर हँडलवरुन केलेले ट्विट आणि टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, डीएन नगर पोलिसांनी कॅब चालक योगेंद्र उपाध्याय (Yogendra Upadhyaya) याला ताब्यात घेतले आणि त्याला वांद्रे येथील सुट्टी कोर्टासमोर (Holiday Court in Bandra ) हजर केले जेथे त्याच्यावर आयपीसीच्या कलम 354 (ए) आणि 509 चे आरोप ठेवण्यात आले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, यूएसस्थित उद्योगपती एका महिन्यापासून कामानिमित्त भारतात आहेत. तिच्या सहकाऱ्यांसोबत ती अन्य एका शहरातून काम संपवून मुंबईला शनिवारी परतत होती. प्रवासासाठी सर्वांनी मिळून एक कॅब बुक केली होती. हळूहळू आपापल्या थांब्यानुसार सर्वजण उतरुन निघून गेले. शेवटी ही अमेरीकन महिला प्रवासीच कॅबमध्ये राहिली. ती कॅबमध्ये चालकाशेजारी पुढच्या सीटवर बसली होती. तसेच, सर्व सहकारी उतरुन गेल्यामुळे शेवटची उतारु म्हणून केवळ हीच महिला प्रवासी राहिली होती. ती महिला अंधेरी (पश्चिम) येथे उतरणार होती. दरम्यान, कॅब चालकाने तिली पाहून हस्तमैथून सुरु केले.
चालकाचे कृत्य पाहून महिलेने अलार्म वाजवला. तसेच, आरडाओरडा सुरु केला. त्यामुळे आजूबाजूचे पादचारी जमले. त्यांनी आरोपीला पकडले. दरम्यान, या घटनेची माहिती डीएन नगर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपीला पकडून डीएन नगर पोलीस स्टेशनमध्ये नेले आणि त्याच्यावर भारतीड दंड संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. आरोपी उपाध्याय वय 40, हे गोरेगावचे रहिवासी असल्याचे समजते, त्याच्या नावावर आतापर्यंत कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही.
ट्विट
पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने प्रसारमाध्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, महिला अंधेरी (पश्चिम) येथे उतरणार होती. तेवढ्यात ड्रायव्हरने गाडीतच हस्तमैथुन करायला सुरुवात केली. काय चालले आहे हे लक्षात येताच तिने त्याला जेपी रोडवर गाडी थांबवायला सांगितली आणि उतरली. तिने गजर वाजवला. आजूबाजूच्या नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या नागरिकांनी आरोपीला पकडले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)