मुंबईच्या CSMT स्थानकात आता एअरपोर्ट्सच्या धर्तीवर मध्य रेल्वेचं नवं प्रशस्त Namah LOUNGE! कॅफे सर्व्हिस ते ट्रॅव्हल कीट मिळतात 'या' सेवा!
Namah असं त्याचं नाव असून अगदी माफक दरात म्हणजेच प्रति तास 10 रूपयांच्या दरात आता हे प्रवाशांसाठी खुलं देखील झालं आहे.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)वर आता लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणार्यांना वेळ काढण्यासाठी स्टेशनवर इतरत्र फिरत बसण्याची गरज नाही. आता मध्य रेल्वेने सीएसएमटी स्थानकावर वातानुकुलित आणि प्रशस्त प्रतिक्षागृह उभारलं आहे. Namah असं त्याचं नाव असून अगदी माफक दरात म्हणजेच प्रति तास 10 रूपयांच्या दरात आता हे प्रवाशांसाठी खुलं देखील झालं आहे.
नमह हे प्रतिक्षालय सीएसएमटी स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक 14,15,16, 17,18 यांना जोडणार्या कॉरिडोर जवळ आहे. म्हणजेच सीएसएमटी मेन लाईन स्टेशनच्या मुख्य द्वाराजवळ आहे. हे सध्या PPP मोडवर चालवले जात आहे. या वेटिंग रूम मध्ये सोफा, डायनिंग टेबल्स, स्वच्छतागृह, बाथरूम विथ बाथ कीट, वाचनालय, चार्चिंग पॉईंटसह लॅपटॉप सिटिंग अरेंजमेंट, कॅफे सर्व्हिस, बुफे सर्व्हिस, ट्रॅव्हल कीट आदी सेवा मिळणार आहे. एअरपोर्ट्स प्रमाणे ट्रेनच्या येण्या-जाण्याच्या वेळांसाठी LED screen आहेत.
दरम्यान सुरूवातीला सिक्युरिटी डिपॉसिट प्रति व्यक्ती 50 रूपये आहे. ही त्यांना रिफंड केली जाईल. तर वयोगट 5-12 वर्ष यांच्यासाठी प्रति तास 5 रूपये असतील. 5 वर्षांखालील मुलांना ही सेवा मोफत असेल.
येत्या काही काळात चांगला प्रतिसाद मिळाला तर सीएसएमटी प्रमाणेच अशी प्रशस्त प्रतिक्षालयं मुंबईत एलटीटी, दादर, ठाणे, कल्याण या रेल्वे स्थानकामध्येही उभारण्याचा विचार आहे. या माध्यमातून प्रवाशांना मस्त अनुभव देण्यासोबतच रेल्वेचं उत्पन्न वाढवण्याचा विचार रेल्वे करत आहे.
सीएसएमटी स्थानकामध्ये आता मध्य रेल्वेने बॅग रॅपिंग आणि सॅनिटायझिंग सेवा देखील सुरू केली आहे. त्यासाठी प्रवाशी बॅगांचा आकार पाहता 60-80 रूपयांपर्यंत पैसे पैसे आकारत सेवा दिली जात आहे.