Congress Releases Mahayuti's 'Paap Patra': मुंबई कॉंग्रेसकडून महायुतीचं पाप पत्र जाहीर, रॅप सॉंगच्या माध्यमातून सरकरावर टीका (Watch Video)

ऐवढं नाही तर महायुती सरकारवर टीका करण्यासाठी रॅप सॉन्ग सोशल मीडियावर रिलीज केले आहे.

Congress Releases Mahayuti's 'Paap Patra',P C TW

Congress Releases Mahayuti's 'Paap Patra': मुंबई शहराच्या कॉंग्रेस पक्षाने महायुती सरकारचे पाप पत्र प्रसिध्द केले आहे. ऐवढं नाही तर महायुती सरकारवर टीका करण्यासाठी रॅप सॉन्ग सोशल मीडियावर रिलीज केले आहे. मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या सह बाळासाहेर थोरात आणि माजी आमदार मधु चव्हाण, माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम, सरचिटणीस सचिन सावंत यांच्या पुढाकाराने हे पाप पत्र प्रसिध्द करण्यात आले. सोशल मीडियावर कॉंग्रेस पक्षाने रिलीज केले रॅप सॉंग व्हायरल होत आहे. (हेही वाचा- सत्तेत आल्यानंतर धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा रद्द करणार; उद्धव ठाकरे यांचे आश्वासन)

पाप पत्रात नेमकं काय?

महायुती सरकारने आता पर्यंत केलेल्या कामाची यादी यात पाहायला मिळत आहे. धारावी प्रकल्प, अटल सेतू, कोस्टल रोड, रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, शहर सुशोभीकरण प्रकल्प आदींमध्ये २ लाख कोटी रुपयांचे घोटाळे झाल्याचा आरोप या पाप पत्रात केला आहे.

वर्षा गायकवाड यांची टीका

मुंबई कॉंग्रेस पक्षाने रिलीज केले हे रॅप सॉंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'सत्तेतल्या बोक्योंना मस्ती आली काय? असं या गाण्याचे टायटल आहे. पाप पत्र सादर करत असताना, वर्षा गायकवाड यांनी महायुती सरकारला खडे बोल सुनावले आहे. शिंदे- फडणवीस- पवार हे सरकार मुंबईकरांसाठी हानिकारक बनले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून मुंबईची अदोगती झाली. महिलांवरील अत्याचारात वाढ झाली. मुंबईतील सर्व महत्त्वाचे प्रकल्प गुजरात येथे घेवून जात आहे. मुंबईची जमीन आणि संसाधने आम्ही लुटू देणार नाही. या सरकारच्या काळ्या कृत्यांपासून मुंबईला वाचवू असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif