First year Second Merit List 2020: मुंबई मधील कॉलेजेसची पदवी प्रवेशासाठी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर; पहा Cut-Off

तर पहिल्या गुणवत्ता यादीची प्रवेश प्रक्रिया आणि इतर समस्यांमुळे काही महाविद्यालयांच्या गुणवत्ता यादी अद्याप जाहीर झालेली नाही.

First Year Admission | Representational Image | (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे लांबलेली महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया (Admission Process) सुरु झाली असून काल (मंगळवार, 11 ऑगस्ट) दुसरी गुणवत्ता यादी (Second Merit List) जाहीर करण्यात आली. तर पहिल्या गुणवत्ता यादीची प्रवेश प्रक्रिया आणि इतर समस्यांमुळे काही महाविद्यालयांची गुणवत्ता यादी अद्याप जाहीर झालेली नाही. BCom, BSc आणि BA या कोर्सेला विद्यार्थ्यांचे प्राधान्य असल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील काही नामांकित कॉलेजची कट-ऑफ लिस्ट समोर आली आहे.

रुईया कॉलेजमध्ये FYBA साठी कट ऑफ लिस्ट 94.5% लागली आहे. तर पहिल्या मेरिट लिस्टमध्ये 94.33% ने प्रवेश रोखण्यात आला होता. FYBSc (Computer Science) कट ऑफ लिस्ट 82% इतकी आहे. तर FYBSc (General) 84% इतकी आहे. यात मागील वर्षाच्या तुलनेत थोडी वाढ पाहायला मिळत आहे. (प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक येथे पहा)

एचआर कॉलेजची FYBCom ची कट-ऑफ लिस्ट 94.4% इतकी लागली आहे. पहिल्या गुणवत्ता यादीत ही लिस्ट 93.6% इतकी होती. St Xavier’s कॉलेजमध्ये FYBSc साठी 92% वर प्रवेश रोखण्यात आला आहे. तर पहिल्या मेरिड लिस्टमध्ये 94% चा कट-ऑफ होता. FYBA च्या प्रवेशासाठी कला शाखेच्या विद्यार्थांना 80% चा कट-ऑफ आहे. तर इतर विद्यार्थ्यांसाठी 93.6% वर प्रवेश थांबवण्यात आला आहे.

के. सी. कॉलेजमध्ये FYBcom साठी 91.5% चा कट ऑफ आहे. FYBA (psychology) साठी 95.17% FYBSc (Computer Science) साठी 75.8% आणि FYBSc (IT) साठी 75% इतकी कट-ऑफ लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान जय हिंद, मिठीबाई कॉलेज सह इतर काही कॉलेजेसची दुसरी गुणवत्ता यादी अद्याप जारी झालेली नाही.

यंदा 12 वी चा निकाल 16 जुलै रोजी लागला. त्यानंतर प्रथम प्रवेश पूर्व नोंदणीला 18 जुलै पासून सुरुवात झाली. या नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना 4 ऑगस्ट पर्यंतची मुदत देण्यात आली होती. यंदा प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन माध्यमातून पार पडणार आहेत. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या भागांत ऑफलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होणार आहेत.